एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

पाच आरोपींकडून तेरा कोटीचे एमडी ड्रग्ज जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मे 2025
मुंबई, – मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करी करणार्‍या एका टोळीचा परिमंडळ सहाच्या एटीएस आणि आरसीएफ पोलिसांच्या संयुक्त पथकाने पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी तेरा कोटीचे एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहेत. या पाचपैकी एक आरोपी पोलीस तर इतर चार आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ईशान्य मुंबईत एमडी ड्रग्ज तस्करी करणारी एक सराईत टोळी कार्यरत असून ही टोळी काही तस्कराच्या मदतीने संपूर्ण मुंबई शहरात एमडी ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना 19 मार्चला रेहान संतोष शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना साडेचार लाख रुपयांचे 45 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते. चौकशीदरम्यान एमडी ड्रग्ज विक्री करणारी एक टोळी असल्याचे सांगितले होते. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्‍यांची नावे समोर आले होते. त्यानंतर त्याच्या तीन सहकार्‍यांना मुंबई आणि नवी मुंबईतून पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्या चौकशीतून या कटातील एका मुख्य आरोपीस दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या तिन्ही कारवाईत पोलिसांनी 6 किलो 688 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. त्याची किंमत 13 कोटी 37 लाख 60 हजार रुपये इतकी आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यापैकी मुख्य आरोपीला पोलीस तर इतर चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश बाबूशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलस निरीक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मैत्रानंद खंदारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कर्चे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय वाणी, पोलीस हवालदार पाटील, खैरे, पोलीस शिपाई येळे, केदार, माळवे, सानप, राऊत यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page