मित्रांचा फोटो लावून बोगस मॅसेज पाठवून दोघांची फसवणुक
फसवणुकीसह आयटीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – मित्रांचा फोटो लावून बोगस मॅसेज पाठवून दोन व्यक्तींची अज्ञात सायबर ठगांनी ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार मालाड आणि जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालाड आणि ओशिवरा पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
अन्य एका गुन्ह्यांत एका वयोवृद्धाची सायबर ठगांनी सुमारे चार लाखांची फसवणुक केली. क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्याचा बहाणा करुन ही फसवणुक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मालाड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. 71 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मूळचे गोव्याचे रहिवाशी असून त्यांची वयोवृद्ध आई मालाड येथे राहते. तिचे वय सध्या 100 असून तिची प्रकृती ठिक नसल्याने ते गेल्या पाच वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे एका बँकेचे क्रेडिट कार्ड होते. या क्रेडिट कार्डची मुदत 1 मे 2025 संपली होती. त्यामुळे बँकेने त्यांना नवीन क्रेडिट कार्ड पाठविले होते, मात्र गोव्याच्या घरी राहत नसल्याने ते क्रेडिट कार्ड परत गेले होते. त्यानंतर त्यांनी मालाड येथील बँकेत जाऊन क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर त्यांना बँकेने दोन क्रेडिट कार्ड पाठविले होते. मात्र त्यांनी अर्ज केलेले ते क्रेडिट कार्ड नव्हते. दोन दिवसांपूर्वी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. नवीन क्रेडिट कार्ड अॅक्टिव्ह करण्याचा बहाणा करुन त्याने त्यांच्याकडे ओटीपी क्रमांक मागितले होते. मात्र त्यांनी ते दोन्ही क्रेडिट नको आहेत असे सांगितले. यावेळी या व्यक्तीने ते कार्ड अॅक्टिव्ह केल्यानंतर डिअॅक्टिव्ह होईल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्याला ओटीपी क्रमांक शेअर केले होते. ते ओटीपी क्रमांक शेअर केल्यानंतर त्यांच्या कार्डवरुन चार लाख आठ हजार रुपयांचे काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. याबाबतचा मॅसेज प्राप्त होताच त्यांना फसवणुकीचा हा प्रकार समजला होता. त्यानंतर त्यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती.