पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस अटक

मद्यप्राशन करुन गोंधळ घालण्यास मज्जाव केला म्हणून हल्ला

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी गौरव जयवंत शेलार या 27 वर्षांच्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. मद्यप्राशन रस्त्यावर गोंधळ घालण्यास मज्जाव करुन घरी जाण्यास सांगितले म्हणून चारजणांच्य टोळीने संदीप चंपतराव सोनकांबळे यांना शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. याच गुन्ह्यांतील तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

संदीप सोनकांबळे हे दहिसर येथे राहत असून सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी 21 मेला रात्री उशिरा दोन वाजता संदीप सोनकांबळे हे परिसरात गस्त घालत होते. यावेळी बोरिवलीतील बाभईनाका परिसरात गौरव हा त्याच्या तीन सहकार्‍योबत दारुच्या नशेत गोंधळ घालत होता. यावेळी त्यांनी त्याला गोंधळ न घालता घरी जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने गौरवसह इतर तिघांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांचे कॉलर पकडून शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली.

या मारहाणीत त्यांच्या पोटाला, हाताला आणि अंगठ्याला गंभीर दुखापत झाली होती. ही माहिती मिळताच बोरिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी संदीप सोनकांबळे यांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गौरव शेलारला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर गौरवला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page