गोवंडी येथे नऊ वर्षांच्या मुलावर अनैसगिंक अत्याचार

गुन्हा दाखल होताच 30 वर्षांच्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – गोवंडी येथे एका नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलावर त्याच्याच परिचित आरोपी तरुणाने अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस काही तासांत देवनार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नमाजासाठी जात असताना या आरोपीने त्याला एका दुकानात आणून त्याच्यावर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून त्याने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती.

37 वर्षांची तक्रारदार महिला गोवंडीतील देवनार परिसरात राहत असून तिला नऊ वर्षांचा मुलगा आहे. बुधवारी 21 मेला सकाळी साडेपाच वाजता तो नमाजासाठी गेला होता. यावेळी त्याला त्याच्या परिचित आरोपीने जवळच्या एका दुकानात नेले होते. तिथे त्याचा तोंड दाबून त्याला धमकावून त्याने त्याच्यावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर जिवे मारण्याची धमकी देऊन त्याने त्याला सोडून दिले होते. घरी आल्यानंतर त्याने घडलेला प्रकार त्याच्या आईला सांगितला होता.

या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने देवनार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून 30 वर्षांच्या आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध अनैसगिंक लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page