मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – ग्रॅटरोड येथील एका निवासी इमारतीमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा झोन दोनच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. या कारवाईत दहा तरुणीसह महिलांची सुटका करण्यात आली तर सातजणांना अटक करण्यात आली. त्यात कुंटनखान्यातील मॅनेजर महिलेसह सहा वेश्यादलालांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी डी. बी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे बळीत तरुणीसह महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत मुंबई पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेट तसेच कुंटनखान्यातील वेश्याव्यवसायाच्या विरोधात विशेष मोहीम सुरु केली होती. या कारवाईतंर्गत पोलिसांनी आतापर्यंत काही सेक्स रॅकेट टोळ्यासह कुंटनखान्यावर कारवाई केली होती. मात्र ही कारवाई सुरु असताना ग्रँटरोड येथील काही इमारतीमध्ये इतर राज्यातून तरुणींसह महिलांना आणून तिथे त्यांना डांबून ठेवले जाते, त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाली होती. या तक्रारीची शहानिशा सुरु असताना ग्रँटरोड येथील व्ही. पी रोड, पेपर गल्ली, बेग मोहम्मद इमारतीमध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर मलबार हिल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे, पोलीस उपनिरीक्षक ससे, पोलीस शिपाई चव्हाण, शिंदे, महिला पोलीस शिपाई पानडगळे, गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेडगे, महिला पोलीस उपनिरीक्षक देवरे, पोलीस हवालदार कांबळे, पोलीस शिपाई सावंत, पायधुनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नाईक, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई मोकल, एल. टी मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गोगावले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुंभार, पोलीस हवालदार राऊत, पोलीस शिपाई जोूशी, लोंढे, डी. बी मार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुपे, सुमेश पवार, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई अभंग, बेंडकुळे, आदीचे एक विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
या पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने त्याची शहानिशा सुरु केली होती. बोगस ग्राहकाने तिथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याचा सिग्नल देताच मंगळवारी 10 जूनला या पथकाने बेग मोहम्मद इमारतीच्या एका रुममध्ये छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांनी दहा तरुणीसह महिलांची सुटका केली होती बळीत तरुणीसह महिलांच्या चौकशीत तिथे कुंटनखाना सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. यातील बहुतांश तरुणीसह महिलांना इतर राज्यातून फुस लावून मुंबईत आणून त्यांना तिथे वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात होते. तिथे ग्राहक म्हणून आलेल्या चौघांना ताब्यात घेतले होते. त्यात दोन डॉक्टरचा समावेश होता. या सर्वांना नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या तरुणीसह महिलांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी सातजणांना पोलिसांनी अटक केली.
त्यात एका कुंटनखान्याच्या मॅनेजर महिलेसह सहा वेश्यादलालांचा समावेश होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे यांच्या तक्रारीवरुन संबंधित सात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर या सर्वांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले. बळीत तरुणीसह महिलांची मेडीकल करण्यात आली असून मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी 83 हजार 300 रुपयांची कॅश, मोबाईल, दहा हजार रुपयांचे दोन ग्रॅम एमडी ड्रग्जसहीत इतर मुद्देमाल जप्त केला आहे.