कलरसह रिपेरिंगचे 92 लाखांचे दागिने कर्मचार्‍याने पळविले

दागिन्यांचा अपहारप्रकरणी कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 जून 2025
मुंबई, – कलरसह रिपेरिंग आणि जागंड करण्यासाठी दिलेले सुमारे 92 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन कंपनीच्या एका कर्मचार्‍याने पलायन केल्याची घटना ऑपेरा हाऊस परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी कर्मचार्‍याविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन फसणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजीव रंजीत घोष असे या कर्मचार्‍याचे नाव असून तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच डी. बी मार्ग पोलिसांची टिम कोलकाता येथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रुशील राकेश झव्हेरी हे ज्वेलर्स व्यावसायिक असून त्यांची दिप्ती अमिषा नावाची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीत पाच पार्टनर असून कंपनीचे मुख्य कार्यालय ऑपेरा हाऊस येथील प्रसाद चेंबरमध्ये आहे. ही कंपनीत ज्वेलर्स दागिने बनवून त्याची विक्री करत असून त्यासाठी कंपनीत तीस कर्मचारी कामाला आहे. त्यापैकी राजीव घोष याच्यासह इतर दोघांवर कंपनीच्या दागिन्यांचे कलर, रिपेरिंग आणि जांगड करण्याची मुख्य जबाबदारी होती. राजीव हा पूर्वी रुशील झव्हेरी यांच्या कारखान्यात कारागिर म्हणून कामाला होता. नंतर त्याला कंपनीत वरिष्ठ पदावर कामावर ठेवण्यात आले होते.

मे 2025 रोजी रुशील झव्हेरी यांना कंपनीतील काही दागिन्यांमध्ये तफावत दिसून आले. तपासणीदरम्यान काही दागिने मिसिंग होते. त्यामुळे त्यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात राजीव हा दागिने चोरी करत असल्याचे दिसून आला होता. राजीव दागिने स्वतच्या शर्टाच्या खिशातून बाहेर जात होता. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्याच्याकडे जाब विचारला होता. मात्र त्याने उडवाउडवीचे उत्तर देऊन तेथून पलायन केले होते. त्यानंतर तो कामावर आला नाही. त्याची चौकशी केल्यानंतर तो त्याच्या कोलकाता येथील गावी गेल्याचे रुशील झव्हेरी यांना समजले होते.

तपासात 1 फेब्रुवारी ते 14 मे 2025 या कालावधीत कंपनीने राजीवला कलरसह रिपेरिंग आणि जांगड करण्यासाठी दिलेले 886 ग्रॅम वजनाचे 92 लाख रुपयांचे विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच रुशील झव्हेरी यांनी कंपनीच्या वतीने राजीवविरुद्ध डी. बी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजीव हा कोलकाताच्या हावरा, जपाडगा, डोमजुरचा गावचा रहिवाशी आहे. तो त्याच्या गावी पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page