वांद्रे येथील स्पामध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मॅनेजर महिलेस अटक तर अल्पवयीन मुलीसह तीन तरुणींची सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – वांद्रे येथील एका स्पामध्ये मसाजच्या नावाने चालणार्या सेक्स रॅकेटचा परिमंडळ नऊच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी शीतल या स्पाच्या मॅनेजर महिलेस पोलिसांनी अटक करुन तिला पुढील चौकशीसाठी वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत स्पाचा चालक भिमसिंग नाईक याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. स्पामधून पोलिसांनी एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह तीन तरुणींची सुटका केली आहे. मेडीकलनंतर त्यांना बाल तसेच महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
योगेश संजीवन नरळे हे कांदिवलीतील समतानगर, सदगुरु कृपा चाळीत राहत असून सध्या आंबोली पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवार २६ मार्चला सांताक्रुज पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे यांना वांद्रे येथील पालीनाका, धीरज आर्केडमध्ये असलेल्या स्पा व्हिलामध्ये मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून त्यांची शहानिशा केली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच पोलीस निरीक्षक ज्योती हिबारे, पोलीस निरीक्षक प्रदीप केरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पवार, अजय कांबळे, वाघमोडे, पोलीस हवालदार पवार, कदम, पोलीस शिपाई योगेश नरळे, महिला पोलीस शिपाई आनेराव यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. ठरल्याप्रमाणे पोलिसांच्या बोगस ग्राहकांनी स्पामध्ये प्रवेश करुन शारीरिक संबंधासाठी दोन तरुणींची निवड केली होती. त्यासाठी कॅश काऊंटरवर असलेल्या शीतल या मॅनेजरकडे पैसे देण्यात आले होते. या ग्राहकाकडून सिग्नल प्राप्त होताच पोलिसांनी स्पा व्हिलामध्ये छापा टाकला होता. यावेळी स्पामध्ये असलेल्या चार तरुणींची पोलिसांनी सुटका केली. त्यात एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा समावेश होता. या मुलीसह तरुणींची चौकशी केल्यानंतर तिथे मसाजच्या नावाने सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. स्पाची मॅनेजर शीतल ही मसाजसाठी येणार्या ग्राहकांसोबत त्यांना शारीरिक संबंधासाठी पाठवत होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. पंधरा वर्षांच्या मुलीने तिला कामाची गरज होती. त्यामुळे तिने स्पाचा चालक भीमसिंग नाईक याची भेट घेऊन त्याला नोकरीवर ठेवण्याची विनंती केल्याचे उघडकीस आले.
भीमसिंग हा स्पाचा चालक असून त्याने शीतलला तिथे मॅनेजर म्हणून कामावर ठेवले होते. ते दोघेही या तरुणींच्या मदतीने स्पामध्ये सेक्स रॅकेट चालवत होते. या माहितीनंतर शीतलसह भिमसिंग यांचयाविरुद्ध पोलिसांनी भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच शीतलला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी २५ हजार ५०० रुपयांची कॅश आणि सोळा हजाराचे दोन मोबाईल जप्त केले आहे. सुटका केलेल्या मुलीसह तिन्ही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. या गुन्ह्यांत भीमसिंगला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.