विदेशी चलनासह हिर्‍यांच्या तस्करीप्रकरणी प्रवाशाला अटक

पावणेदोन कोटीच्या हिर्‍यासह विदेशी चलन जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – दुबईहून जाणार्‍या इंडिगो एअरवेजच्या विमानातून विदेशी चलनासह हिरे घेऊन एका प्रवाशाला सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी अक केली. त्याच्याकडून या अधिकार्‍यांनी सव्वाअकरा लाखांचे पन्नास हजार सौदी रियासल आणि 652 कॅरेटचे सव्वाकोटीचे हिरे असा सुमारे पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विदेशी चलनासह हिर्‍यांची तस्करी केल्याप्रकरणी आरोपी प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली. अन्य एका कारवाईत सीमा शुल्क विभाागाने सुमारे 25 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी आरोपी प्रवाशी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तो इंडिगो एअरवेजने दुबईला जाणार होता. त्याच्यासह बॅगेची तपासणी केल्यानंतर त्याने विदेशी चलनासह हिरे आणल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला सीमा शुल्क विभागाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर या अधिकार्‍यांना 11 लाख 15 हजार 50 हजार सौदी रियाल, 1 कोटी 23 लाख 72 लाख 450 रुपयांचे 652 कॅरेटचे विविध प्रकारचे हिरे सापडले. विदेशी चलन आणि हिरे ताब्यात घेतल्यानंतर या प्रवाशाची चौकशी करण्यात आली होती. या चौकशीनंतर त्याला या अधिकार्‍यांनी अटक केली. विदेशी चलन त्याने काळ्या रंगाच्या स्लिंग बॅगेत तर शरीराच्या पोकळीत तीन पाऊचमध्ये हिरे लपवून आणले होते. मात्र दुबईला हिरे घेऊन त्याचा प्रयत्न सीमा शुल्क विभागाने हाणून पाडला

25 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह तिघांना अटक
या कारवाईनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने दोन प्रवाशासह तिघांना अटक केली. या तिघांकडून या अधिकार्‍यांनी सुमारे 25 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बँकाँकहून येणार्‍या विमानातून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती कस्टम अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्‍यांनी बँकाँकहून येणार्‍या प्रत्येक संशयित प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.

ही कारवाई सुरु असताना दोन प्रवाशांना या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना 24 किलो 960 ग्रॅम वजनाचे हायड्रोपोनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे 25 लाख रुपये इतकी आहे. त्यांनी हा गांजा व्हक्यूम पद्धतीने लपवून आणला होता. चौकशीदरम्यान त्यांना हा गांजा विमानतळााबाहेर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर गांजा घेण्यासाठी आलेल्या संबंधित व्यक्तीला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page