मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – मागणीनुसार विविध हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये तरुणींना ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्या एका टोळीचा बांगुरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली असून तिच्या तावडीतून तीन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. मेडीकलनंतर या तिन्ही तरुणींना पोईसर येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अटक केलेल्या रेहाना हिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कारवाईच्या भीतीने गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ऑनलाईन सेक्स रॅकेटचे प्रमाण प्रचंड वाढले होते. ही टोळी प्रत्यक्षात न भेटता मोबाईलवरुन संभाषण करुन ग्राहकांच्या मागणीनुसार काही तरुणींना त्यांच्यासोबत हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉजमध्ये पाठवत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अशा ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बोरिवली परिसरात राहणारी रेहाना नावाची एक तरुणी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालविते. ती तिच्या संपर्कात असलेल्या काही तरुणींना ग्राहकांसोबत विविध हॉटेलमध्ये पाठवते.
तिचा संपूर्ण व्यवहार ऑनलाईन चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने रेहाना संपर्क साधून तिच्याकडे तीन तरुणीची मागणी केली होती. मोबाईलवरुन सर्व व्यवहार झाल्यांनतर तिने या ग्राहाकाला मालाड येथील चिंचोली बंदर परिसरात बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे दुपारी पावणेदोन वाजता रेहाना ही तीन तरुणीसोबत तिथे आली होती. यावेळी तिचे बोगस ग्राहकासोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई केली होती. यावेळी रेहाना ताब्यात घेतल्यांनतर तिच्यासोबत असलेल्या तिन्ही तरुणींची पोलिसांनी सुटका केली.
या तिघींच्या चौकशीतून रेहाना ही सेक्स रॅकेट चालवत असून तिच्या सांगण्यावरुन ते ग्राहकासोबत शारीरिक संबंधासाठी आल्याचे सांगितले. हा प्रकार उघडकीस येताच तिच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तिला अटक केली. सुटका केलेल्या तिन्ही मुलींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते. अटकेनंतर रेहाना विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.