पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने शिक्षिकेची ऑनलाईन फसवणुक

तीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – हॉटेलला रिव्ह्यू देण्याचे पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने एका शिक्षिकेची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या आरोपीस तीन महिन्यानंतर कांदिवली पोलिसांनी अटक केली. कुशल पप्पूराम चौधरी असे या 19 वर्षीय आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने फसवणुक करणारी ही एक सराईत टोळीने असून या टोळीने आतापर्यंत अनेकांना ऑनलाईन गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

24 वर्षांची तक्रारदार तरुणी ही कांदिवलीतील इराणीवाडीत राहत असून ती शिक्षिका म्हणून काम करते. मार्च महिन्यांत तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तिला हॉटेल्सचे रिव्ह्यू देण्याचे टास्कसंदर्भात पार्ट टाईमची ऑफर दिली होती. घरबसल्या तिला दिवसाला चांगले पैसे मिळतील असे सांगून तिचा विश्वास संपादन करण्यात आला होता. त्यामुळे तिने ती ऑफर स्विकारुन त्याने दिलेले लिंक ओपन करुन विविध हॉटेल्सला रिव्ह्यू देण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक रिव्ह्यूमागे तिला 203 रुपये मिळत होते. ती रक्कम तिच्या बॅक खात्यात जमा होत होती. त्यामुळे तिला त्याच्यावर विश्वास बसला होता.

कही दिवसांनी तिला तिचे अकाऊंट रजिस्ट्रर करण्यास सांगून त्याने तिला क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. या गुुंतवणुकीवर तिला चांगला परवाता मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवून किप्टो करन्सीच्या टास्कमध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली होती. या गुंतवणुकीवर तिला चांगले कमिशन मिळत होते. त्यामुळे त्याने तिला आणखीन रक्कम गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. जास्त कमिशनच्या मोहापोटी 13 मार्च ते 15 मार्च या कालावधीत तिला पाठविण्यात आलेल्या लिंकवरुन तिने सर्व टास्क पूर्ण करुन सुमारे चार लाखांची गुंतवणुक केली होती.

मात्र या गुंतवणुकीवर तिला कुठलाही परतावा मिळाला नव्हता. तिने संबंधित व्यक्तीकडे विचारणा सुरु केली होती. यावेळी त्यांनी तिला आणखीन सहा लाख रुपये गुंतवणुक करण्यास सांगितले, ही रक्कम गुंतवणुक केल्यास तिला मूळ रक्कमेसह परतावा रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी कुशल चौधरी या तरुणाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. तपासात फसवणुकीची रक्कम कुशलसह त्याच्या इतर सहकार्‍यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. ही रक्कम नंतर त्यांनी एटीएमद्वारे काढली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page