दोन फ्लॅटसाठी दिलेल्या 52 लाखांचा हेव्ही डिपॉझिटचा अपहार

प्रॉपटी एजंटसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 जून 2025
मुंबई, – दोन फ्लॅटसाठी दिलेल्या सुमारे 52 लाखांचा हेव्ही डिपॉझिटचा अपहार केल्याप्रकरणी एका प्रॉपटी एजंटसह तोतया फ्लॅट मालक अशा चौघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आमीर अफल खांडवाला, मोहम्मद आसिफ नबीउल्ला शेख, शबाना मोहम्मद आसिफ शेख आणि सलमा सिंकदर खान अशी या चौघांची नावे आहेत. यातील आमीर हा फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. फसवणुकीनंतर तो श्रीलंका येथे पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

नदीम अहमद इब्राहिम कासवानी हे जोगेश्वरी येथे राहत असून ते इव्हेटस व्यावसायिक आहेत. 2009 ते 2018 या कालावधीत ते लंडन येथे स्थायिक होते. त्यांना ब्रिटीश नागरिकत्व मिळाले आहे. त्यांचे आई-वडिल वयोवृद्ध असल्याने ते अधूनमधून मुंबईत येत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांना मुंबई शहरात स्वतचा व्यवसाय सुरु करायचा होता. व्यवसायासोबत काही ठिकाणी गुंतवणुक करायची असल्याने त्यांनी ह माहिती त्यांचा परिचित अमीर खांडवाला याला सांगितली होती. त्याने त्यांना काही प्रॉपटीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यात हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट घेऊन ते फ्लॅट भाड्याने दिल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. याच दरमन त्याने त्यांना जोगेश्वरीतील काही फ्लॅटची माहिती दिली होती. त्यापैकी एक फ्लॅट त्यांनी हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता.

फ्लॅटची मालकीण शबाना शेख हिची भेट घेतल्यानंतर त्यांच्यात तिचा फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. शबानाला पैशांची गरज होती, त्यामुळे तिने तिचा फ्लॅट त्यांना हेव्ही डिपॉझिटवर देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांच्यात एक वर्षांचा करार झाला. या करारानंतर त्यांनी तिला 21 लाखांचे पेमेंट केले होते. फ्लॅटचा ताबा मिळताच त्यांनी तो फ्लॅट भाड्याने दिला होता. त्याचे नियमित भाडे त्यांच्यासह आमीर याच्या बँक खात्यात येत होते. याच दरम्यान आमीरने त्यांना दुसरा फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट मोहम्मद आसिफ आणि सलमा खान यांच्या मालकीचा होता. त्यांचा फ्लॅटही त्यांनी हेव्ही डिपॉझिट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी त्यांना 31 लाख रुपये दिले होते. या फ्लॅटवरही त्यांनी 32 हजाराच्या भाड्यावर एक भाडेकरु ठेवला होता.

एक वर्षांनंतर त्यांनी त्यांच्या हेव्ही डिपॉझिटची ामगणी केली होती, यावेळी आमीरसह इतर फ्लॅट मालकांनी दुसर्‍या व्यक्तीला हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देऊन त्यांची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांच्या 52 लाख रुपयांची हेव्ही डिपॉझिटची रक्कम परत केली नाही. चौकशीदरम्यान मोहम्मद आसिफ याच्या मालकीचा तो फ्लॅट नव्हता. तो बोगस फ्लॅटमालक होता. त्याला आमीरनेच त्यांच्याशी फ्लॅटमालक म्हणून ओळख करुन दिली होती. याच दरम्यान त्यांना आमीर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

मे 2023 साली तो श्रीलंका येथे पळून गेला होता. त्यामुळे त्यांनी मोहम्मद आसिफ, शबाना शेख आणि सलमा खान यांच्याकडे पैशांची मागणी केली होती, यावेळी या तिघांनी हेव्ही डिपॉझिटची रक्कम आमीर खांडवाला याच्याकडे दिल्याचे सांगून त्यांचा या पैशांची काहीही संबंध नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे आमीरसह इतर तिघांनी त्यांच्याकडून घेतलेल्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी संबंधित चारही आरोपीविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रांर केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आमीर खांडवाला, मोहम्मद आसिफ शेख, शबाना शेख आणि सलमा खान या चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page