मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 जून 2025
मुंबई, – गोवंडी येथील बैंगनवाडीतील एका निवासी फ्लॅटमध्ये चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकणी 42 वर्षांच्या शमा नावाच्या एका महिलेस पोलिसांनी अटक केली असून तिच्या तावडीतून एका महिलेसह दोन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. मेडीकलनंतर या तिघींना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. शमाविरुद्ध भारतीय न्याय सहितासह पिटा व पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शमा हा गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात राहत असून ती तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने तिच्याशी संपर्क साधून तिच्याकडे काही अल्पवयीन मुलीसह महिलेची मागणी केली होती. यावेळी तिने महिला आणि अल्पवयीन मुलीचे वेगवेगळे दर सांगून त्याला गोवंडी परिसरात बोलाविले होत. ठरल्याप्रमाणे सौदा झाल्यांनतर बोगस ग्राहक तिच्या बैगनवाडी येथील घरी गेला होता. यावेळी त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरु असतानाच अंमलबजावणी पथकाने तिथे छापा टाकला होता.
या कारवाईत शमाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. घटनास्थळी पोलिसांना तीन महिला सापडल्या. त्यात दोन सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलींसह एका 35 वर्षांच्या महिलेचा समावेश होता. या तिघींच्या चौकशीतून शमा ही वेश्याव्यवसाय करत असून ती ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना त्यांच्यासोबत वेश्याव्यवसायासाठी पाठवत होती. अनेकदा ती त्यांना ग्राहकांसोबत हॉटेलमध्ये जाण्यास सांगत होती. ग्राहकांकडून मिळणारी रक्कमेचा काही हिस्सा ती स्वतजवळ आणि उर्वरित रक्कम बळीत मुलीसह महिलांना देत होती.
हा प्रकार उघडकीस येताच तिच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता, पिटा आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत रविवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. बळीत दोन्ही मुलीसह एका महिलेला मेडीकलसाठी पाठविण्यात आले. मेडीकलनंतर त्यांना देवनार येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.