सीजेएम प्रिमिअर लीग करंडकावर बोरिवली न्यायालयाची बाजी

करंडकावर सलग दुसर्‍या वर्षी आपले नाव कोरले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – बोरिवलीतील न्यायालयीन केंद्रातील पुरुष संघाने जीजेएम प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्यात शानदार विजय संपादन करुन सलग दुसर्‍यांदा प्रथम पारितोषिक पटकावले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के मांडवगडे यांच्या हस्ते तसेच इतर सन्माननीय न्यायाधिशांच्या उपस्थितीत क्रिकेट सामन्यांच्या बक्षिस वितरण समारंभ पार पडले. यावेळी मुंबईतील सर्वच न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबईतील न्यायालयीन कर्मचार्‍यांसाठी यंदाही सीजेएम प्रिमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरिवलीतील न्यायालयीन केंद्रातील पुरुष संघाने करंडक आपल्या नावावर कोरला. या संघाचे नेतृत्व कर्णधार रितेश शर्मा, उपकर्णधार अमीत घोरपडे यांनी केले तसेच तनिल सोलंकी, प्रफुल्ल भडवळकर, ऋषिकेश बांद्रे, दिपक कोळी, प्रकाश शिंदे, धीरज दळवी, जय काकडे, अक्षय भोसले यांनी संघासाठी सांघिक कामगिरी बजावली. संघाला दिलीप घागरे आणि सचिन हिवराळे हे प्रशिक्षक म्हणून तर कविता रानडे यांचे विशेष सहकार्य मिळाले होते.

या क्रिकेटचे सामने 15 फेब्रुवारी 2026 रोजी वांद्रे येथील चेतना कॉलेजच्या क्रिडांगणावर आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेत बोरिवली पुरुष संघ दुसर्‍यांदा अंतिम विजेता ठरला तर गिरगाव संघ उपविजेता ठरला. संघाचे कर्णधार रितेश शर्मा यांनी आपल्या गोलंदाजीचे उकृतष्ट प्रदर्शन करुन उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकावला. प्रफुल्ल भडवळकर यांना उत्कृष्ट मालिकावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. महिला क्रिकेट सामन्यांमध्ये किल्ला न्यायालय यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर अंधेरी न्यायालयाचा क्रिकेट संघ उपविजेता ठरला.

क्रिकेट सामन्याचे बक्षिस वितरण समारंभ 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्याय दंडाधिकारी ए. के. मांडवगडे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी सन्माननीय न्यायाधिश आणि कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मुख्य न्याय दंडाधिकारी, न्यायालय कर्मचारी संघटना आणि पूजा समितीने आयोजित केलेल्या बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी भगवान नारायणराव चिकणे व बोरिवलीतील न्यायालयीन केंद्रातील न्यायिक अधिकारी यांनी खेळांडूचे पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page