गोरेगाव येथे उत्तर भारतीय संमेलनाचा कार्यक्रम संपन्न

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ जून २०२६
मुंबई, – भारतीय जनता पार्टीच्या उत्तर भारतीय मोर्चाद्वारे उत्तर भारतीय संमलेन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यासह कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. संमेलनाचे आयोजक आणि मुंबई भाजपा उपाध्याक्ष विजय दयाशंकरजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडललेया या संमेनलाला हजारो उत्तर भारतीयांची उपस्थिती होती.

रविवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजता मेवाड भवन हॉल, सोनावाला इंडस्ट्रिज इस्टेट, गोरेगाव येथे हे संमेलन झाले. या कार्यक्रमाला बहुजन विकास आघाडीतील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि भाजपच्या विचारसरणीवर विश्‍वास ठेवत भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेश खजिनदार, सिद्धीविनायक मंदिराचे कोषाध्ययक्ष संजय पांडे, मुंबई भाजपा महामंत्री आचार्य पवन चतुर्वेदी आणि उत्तर भारतीय मोर्चाचे मुंबई अध्यक्ष प्रमोद मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाला उत्तर भारतीय समाजातील बंधू-भगिनींचा मोठा सहभाग लागला होता. त्यांचा उत्साह अवर्णनीय होता. याप्रसंगी भाजपामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वांचे आभार मानण्यात आले. तसेच पक्षात सहभागी झालेल्या सर्वांना संघटनेत नवी भूमिका स्विकारत उत्तर भारतीय समाजाच्या सेवेबद्दल आम्ही कटीबद्ध राहू अशी प्रतिज्ञाही घेतली. या नवीन प्रवेश घेतलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे संघटनेत एक प्रकार नवी उर्जा आली असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी विप्लव अवसरे, लक्ष्मण नाडार, लव जायस्वाल, प्रितेश पटेल, विनोद पाखरे यांनी विशेष प्रयत्न केले होते. मुंबईत आता पावसाळा सुरु होणार असल्याने संमेलनात छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात ाअला होता. उपस्थित सर्वांना छत्री वाटप करण्यात आली होती. पावसाळ्यापूर्वी लोकउपयोगी असा कार्यक्रम केल्याबद्दल उपस्थित उत्तर भारतीय समाजातील जनतेने आयोजकांचे विशेष आभार मानले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page