एटीएस प्रमुखांच्या नावाने वयोवृद्धाची 33 लाखांची फसवणुक

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – एटीएस प्रमुखांच्या नावाने एका वयोवृद्धाची सायबर ठगाने सुमारे 33 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार काळाचौकी परिसरात उघडकीस आला आहे. पाकिस्तानी बँक खात्याचा उल्लेख करुन ही फसवणुक झाली असून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार हे काळाचौकी येथे राहत असून ते एका मिल मधून सेवा निवृत्त आहेत. गेल्या डिसेंबर मध्ये त्याना एका नंबरवरून फोन आला. त्याने तो शिवाजी नगर पुणे पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे भासवले. त्याच्या आधारकार्डचा गैर वापर करून दोघांनी आधारकार्ड बनवले असल्याचे त्याना सांगितले. त्यात खात्यात एकूण ७ कोटी रुपये जमा झाले आहे. त्यातील रक्कम कमिशन म्हणून मिळाल्याच्या भूलथापा मारल्या. पोलीस ठाण्यात येऊन भेटा असे सांगून ठगाने फोन ठेवला.

काही वेळाने त्याना एका नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. त्यावर एटीएस चीफ असे नाव होते. फोनवर बोलणाऱ्याने एटीएस चीफ अधिकारी असल्याचे सांगितले. त्या बँक खात्यात पाकिस्तान मधून ७० मिलियन डॉलर जमा झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला देश सोडून जाण्यास मनाई केल्याचा ठगाने बहाणा केला. तसेच ७० लाख रुपये खात्यात जमा झाल्याचे त्याना सांगितले. ठगाने भीती दाखवून त्याच्या बँक खात्याची माहिती घेतली. काही वेळाने आणखी एकाने त्याना फोन केला.

त्याने त्याचे नाव सांगून गोपनीय कागदपत्रे पाठवले. कागदपत्रे वाचून घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे कारवाई न केल्यास अटक केली जाईल अशी भीती दाखवली. कारवाईच्या नावाखाली ठगाने त्याना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. भीती पोटी त्याने ३३ लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे भरल्यानंतर त्याने त्या नंबरवर फोन केला. तेव्हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. फसवणूक प्रकरणी त्याने मध्य प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page