विधानसभा, हायकोर्ट, मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व बँकेत बॉम्बचा मेल

बॉम्बच्या मेलमुळे मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मार्च 2026
मुंबई, – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विधानसभा आणि विधानपरिषेत कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना गुरुवारी विधानसभा, मुंबई हायकोर्ट, मेट्रो स्टेशन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि काही नामांकित बँकेत बॉम्बस्फोटाच्या निनावी मेलमुळे एकच खळबळ उडाली होती. या बॉम्बच्या अफवेने मुंबई पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. संपूर्ण परिसराची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान बॉम्बचा निनावी मेल पाठवून दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध सायंकाळी मरिनड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

सध्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 23 फेब्रुवारीपासून या अधिवेशनाला सुरुवात झाली होती. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषद आदी ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडले जात आहे. स्वत वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्ताची पाहणी करत आहेत. त्यातच गुरुवारी सकाळी सात वाजता विधीमंडळाच्या अधिकृत ईमेलवर एका अज्ञात व्यक्तीने विधानसभा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे हायकोर्ट, मुंबईतील मेट्रो स्टेशन आणि बँकेत संभाव्य बॉम्ब हल्ल्याचा निनावी मॅसेज पाठविला होता. हा प्रकार लक्षात येताच त्याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली.

या माहितीनंतर स्थानिक पोलिसांसह बॉम्बशाीेधक व नाशक पथकाने श्वान पथकासह विधानसभा परिसरात तपासणी सुरु केली होती. संपूर्ण परिसर रिकामा करुन प्रत्येक ठिकाणाची कसून तपासणी करण्यात आली होती. सर्व कर्मचार्‍यांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र तपासणी केल्यानंतर तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. अशाच प्रकारे बॉम्बे हायकोर्ट, मेट्रो स्टेशन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि बँकेची तपासणी करण्यात आली होती, मात्र तिथेही काहीही सापडले नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. या धमकीनंतर या सर्व ठिकाणाच्या पोलीस बंदोबस्तात प्रचंड वाढ काढण्यात आली होती.

या मेलमध्ये खलिस्तानी समर्थक चळवळीचा उल्लेख करण्यात आला होता. त्यात खलिस्तानी समर्थकांची नावे देण्यात आली होती. विशेष म्हणजे मेलमध्ये संभाव्य क्षेपाणास्त्र आणि बॉम्ब हल्ल्याचा उल्लेख करण्यात आल्याने त्याची मुंबई पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. मात्र बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. सायंकाळी उशिरा बॉम्बची धमकीचा मेल पाठविणार्‍या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या धमकीची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांना संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तपासात काही महत्त्वाची गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. मात्र तपास सुरु असल्याने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला. दरम्यान बॉम्बच्या या अफवेने मुंबई पोलिसांची चांगली तारांबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page