पत्नीच्या मित्राकडून पतीवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला

हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत आरोपी मित्राला अटक कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मार्च 2026
मुंबई, – मैत्रीपूर्ण संबंधावरुन पत्नीच्या मित्रानेच पतीवर तिक्ष्ण हत्याराने वार करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना भांडुप परिसरात उघडकीस आली आहे. या हल्ल्यात सचिन नामदेव बनसोडे हा 46 वर्षांचा व्यक्ती गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सचिन वसंत घार्गे या 36 वर्षांच्या आरोपी मित्राला भांडुप पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना मंगळवारी 17 मार्चला रात्री पाऊणच्या सुमारास भांडुप येथील टेंभीपाडा, राकेश कुंज परिसरात घडली. याच परिसरात सचिन बनसोडे हा त्याच्या कुटुंबियासोबत राहत असून तो सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. आरोपी सचिन घार्गे हादेखील याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. सचिन बनसोडेच्या पत्नीचे सचिन घार्गेशी मैत्रीपूर्ण संबंध होते. ते दोघेही सतत एकमेकांच्या संपर्कात होते. मंगळवारी त्याची पत्नी घरी नव्हती. त्यामुळे त्याने तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली होती. रात्री उशिरा तो सचिन घार्गे याच्या घरी गेला होता. यावेळी त्याची पत्नी त्याच्या घरी होती. त्यामुळे त्याने सचिन घार्गेसह त्याच्या पत्नीला जाब विचारला होता. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

रागाच्या भरात त्याने सचिन बनसोडेला आज तुझा गेम करतोच. माझ्यावर अशीही एक केस आहे. त्यानंतर त्याने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात सचिन बनसोडे याच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी जखमी झालेल्या सचिनला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच भांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी सचिन बनसोडे याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्याच्या जबानीवरुन पोलिसांनी सचिन घार्गे यााच्यावर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page