ओएनजीसी कंपनीच्या प्लेटफॉर्मवर चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश

पंधरा लाखांच्या चोरीच्या मुद्देमालासह तिघांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 मार्च 2026
मुंबई, – ओएनजीसी कंपनीच्या प्लेटफॉर्मवर चोरी करणार्‍या एका टोळीचा येलोगेट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत धर्माजी पाटील, संतोष कृष्णा पाटील आणि विद्याधर गजानन म्हात्रे अशी या तिघांची नावे असून ते तिघेही रायगडचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी सुमारे पंधरा लाखांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

गेल्या काही महिन्यांत ओएनजीसी कंपनीच्या प्लेटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत होत्या. अज्ञात व्यक्तीकडून विविध साहित्यांची चोरी होत असल्याने कंपनीच्या वतीने येलोगेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. याबाबत चार तक्रारी प्राप्त होताच पोलिसांनी चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली होती. या घटनेची अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन राठोड यांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त पंढरीनाथ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन राठोड, पोलीस निरीक्षक रविंद्र मोहिते यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धैर्यशील सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोडकर, पोलीस हवालदार रणजीत ठाकूर, वाडिले, पोलीस शिपाई सिकंदर डोलकर, प्रविण बावा, योगेश पाटील, जमादार यांनी तपास सुरु केला होता. आरोपींचा शोध सुरु असताना या पथकाने चंद्रकांत पाटील, संतोष पाटील आणि विद्याधर म्हात्रे या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत ते तिघेही मूळचे रायगडचे रहिवाशी आहे. यातील चंद्रकांत हा मासेमारी बोटीचा मालक आहे तर इतर दोनजण त्याचे कर्मचारी आहेत. या तिघांनी ओएनजीसी कंपनीच्या प्लेटफॉर्मवर चोरी केलची कबुली दिली. तंच्याकडून पोलिसांनी 10 लाख 70 हजार रुपयांच्या 49 बॅटरी आणि गुन्ह्यांतील मासेमारी बोट हस्तगत केली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे पंधरा लाख रुपये इतकी आहेत. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page