आधारकार्डवर फेरफार करुन हॉटेलमध्ये आणून लैगिंक अत्याचार

अल्पवयीन मैत्रिणीच्या तक्रारीवरुन आरोपी मित्राला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
21 मार्च 2026
मुंबई, – आधारकार्डवर फेरफार करुन अल्पवयीन मैत्रिणीचे वय वाढवून तिला हॉटेलमध्ये आणून तिच्यावर तिच्याच मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना विक्रोळी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मैत्रिणीच्या तक्रारीवरुन पार्कसाईट पोलिसांनी आरोपी मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला गुरुवारी पोलिसांनी केली. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे. केवळ शारीरिक संबंधासाठी आरोपीने मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून तिची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आहे.

17 वर्षांची पिडीत मुलगी चेंबूर येथे राहते तर आरोपी घाटकोपर येथे राहतो. ते दोघेही एकमेकांच्या परिचित असून चांगले मित्र आहेत. त्याची मैत्रिण अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याने तिचे आधारकार्ड घेतले होते. या आधारकार्डमध्ये असलेल्या तिच्या जन्मतारीखेत फेरफार करुन तिचे वय वाढवून दिले होते. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये आणून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. नोकरीचे आमिष दाखवून तसेच धमकावून नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा लैगिंक अत्याचार केला होता.

गेल्या चार महिन्यांत त्याने तिला नोकरी दिली नाही. केवळ शारीरिक संबंधासाठी त्याने तिच्या आधारकार्डमधील जन्मतारीखेत फेरफार करुन हॉटेलमध्ये आणून त्याने तिचा गैरफायदा घेतला होता. मित्राकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तिने पार्कसाईट पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी हा एका गारमेंट शॉपमध्ये कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page