दोन अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन करुन महिलेचा विनयभंग

दोन गुन्ह्यांत आरोपी रिक्षाचालकासह सुरक्षारक्षकाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 मार्च 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत चार आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांशी अश्लील चाळे करुन गैरवर्तनासह एका महिलेचा विनयभंगाचा प्रकार वांद्रे आणि चेंबूर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी खेरवाडी आणि चेंबूर पोलिसांनी दोन स्वतंत्र विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यात एका रिक्षाचालकासह सुरक्षारक्षकाचा समावेश आहे.

28 वर्षांच तक्रारदार महिला ही नवी मुंबईतील कौपरखैरणे परिसरात राहत असून तिला चार वर्षांचा एक मुलगा आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता ती वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर परिसरात आली होती. यावेळी आरोपी रिक्षाचालकाने तिच्या चार वर्षांच्या मुलाशी अश्लील चाळे करुन त्याचा गैरवर्तन केले होते. तसेच तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर तिने खेरवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता, गुन्हा दाखल होताच 45 वर्षांच्या आरोपी रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

दुसरी घटना चेंबूर परिसरात घडली. मित्राला शोधण्यासाठी टेरेसच्या पॅसेजवरुन जाणार्‍या एका आठ वर्षांच्या मुलावर सुरक्षारक्षकाने अश्लील लैगिंक चाळे करुन विनयभंग केला. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच 43 वर्षांच्या आरोपी सुरक्षारक्षकाला चेंबूर पोलिसांनी अटक केली. 43 वर्षांचे तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहतात. याच परिसरात त्यांच्या मालकीचे एक ज्वेलरी शॉप आहे. बळीत त्यांचा आठ वर्षांचा मुलगा असून तो सध्या शाळेत शिकतो. शनिवारी रात्री नऊ वाजता हा मुलगा त्यांच्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील टेरेसकडे जाणार्‍या पॅसेजमध्ये त्याच्या मित्राला शोधण्यासाठी गेला होता.

यावेळी तिथे इमारतीचा सुरक्षारक्षक आरोपी आला आणि त्याने त्याला पकडून त्याच्याशी अश्लील चाळे करुन त्याच्यावर लैगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकाराने तो प्रचंड घाबरला आणि घरी येताच त्याने हा प्रकार त्याच्या तक्रारदार वडिलांना सांगितला होता. मुलाकडून ही माहिती समतताच त्यांना धक्काच बसला होता. या घटनेनंतर त्यांनी चेंबूर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी सुरक्षारक्षकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच 43 वर्षांच्या आरोपी सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page