प्रियकरासोबतच्या कथित संबंधाच्या संशयावरुन तरुणीचे केस कापले
केस कापल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरलची धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मार्च 2026
मुंबई, – प्रियकरासोबतच्या कथित संबंधाच्या संशयावरुन एका 20 वर्षांच्या तरुणीचे तिच्याच मैत्रिणीसह तिच्या दोन मैत्रिणीने केस कापून केस कापत असल्याचा व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी लायबा हलानीसह तिच्या दोन्ही मैत्रिणी अशा तीन तरुणीविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता अंधेरीतील वर्सोवा, म्हाडा एसव्हीपी नगरात घडली. याच परिसरात तक्रारदार तरुणी त्याच्या आई-वडिलांसोबत राहते. सध्या ती कॉलेजमध्ये शिक्षण घेते तर तिच्या वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्याच्या कॉमन मित्रांच्या माध्यमातून तिची लायबा हलानी आणि हर्षदसोबत ओळख झाली होती. अल्पावधीत ते दोघेही त्याचे चांगले मित्र झाले होते. लायबा आणि हर्षद हे दोघेही रिलेशनमध्ये होते. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. अनेकदा चॅटदरम्यान हर्षद हा तिला तक्रारदार तरुणीच्या केसाबाबत बोलत होता. ती त्याला आवडत असून लवकरच त्याला भेटणार आहे असे सांगत असे. त्याचा तिच्या मनात राग होता. तिला तक्रारदार तरुणीसह तिच्या प्रियकराकडे कथित संबंध असल्याचा संशय होता.
मात्र मूळात त्यांच्यात असे काहीही नव्हते. त्यांच्यात अशा प्रकारचे कुठलेही संभाषण झाले नव्हते. तरीही 7 मार्चला लायबा ही तिच्या घरी आली आणि तिने त्यांचा मोबाईल चेक केला असता त्यात तिला अशा प्रकारचे कुठलेही संभाषण दिसून आले नाही. त्यामुळे ती त्याला थॅक्यू म्हणून घरातून निघून गेली. सर्व काही सुरळीत सुरु असताना 25 मार्चला तक्रारदार तरुणी तिच्या घरी होती. यावेळी घरात तिची मोलकरीण होती. काही वेळानंतर दाराची बेल वाजली होती, आईस्क्रिम पार्सल आल्याचे समजून तिने दरवाजा उघडला. यावेळी त्याला दरात लायबा ही तिच्या दोन मैत्रिणीसोबत आल्याचे दिसून आले.
काही कळण्यापूर्वीच लायबाने तिचे केस ओढून तिला बाहेर आणले. त्यानंतर तिने तिचे केस कापण्यास सुरुवात केली होती. यावेळी तिच्यासोबत आलेल्या तिच्या दोन्ही मैत्रिणीने तिचे मोबाईलवरुन व्हिडीओ काढले होते. केस कापत असताना तिने हेअर हेअर नो हेअर असे बोलून त्याचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. केस कापून झाल्यानंतर त्या तिघीही तेथून निघून गेल्या. लायबाला त्याच्यासह तिचा प्रियकर हर्षद यांच्यात चुकीचे संबंध असल्याच्या संशयावरुन तिचे केस कापल्याचे नंतर त्याला समजले होते.
या प्रकारानंतर तक्रारदार तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी लायबा हलानी व तिच्या दोन्ही मैत्रिणीविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वर्सोवा पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असून या तिन्ही तरुणींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.