अजीत पवार यांच्या अपघाताचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी

बोगस व्हिडीओसह बदनामी करणार्‍या आरोपी तरुणाला अटक

0

अरुण सावरटकर
7 एप्रिल 2026
मुंबई, – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमान अपघाताचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करुन सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी जालन्यातून एका तरुणाला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. उद्धव भगवान कापसे असे या आरोपी तरुणाचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने शुक्रवार 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उद्धव कापसे याच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडीओला आतापर्यंत दिड लाख फ्लोवर्स प्राप्त झाले होते. हा व्हिडीओ नंतर सोशल मिडीयावरुन डिलीट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्याने अपघाताची दिशाभूल माहिती प्रसिद्ध करुन मुख्यमंत्र्यांची बदनामीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

जानेवारी महिन्यांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. या अपघातात अजीत पवार यांच्यासह सहाजणांचा जागीच मृत्यू झाला होात. मुंबईहून बारामतीच्या दिशेने सभेसाठी एका खाजगी विमानाने अजीत पवार हे जात होते. यावेळी बारामती विमानतळावर लॅडिंगदरम्यान हा अपघात झाला हाता. एका शेतामध्ये विमान कोसळले होते. या अपघातात सोशल मिडीयावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये विमान अपघातात अनेकांनी शंका उपस्थित केले होते. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यात अजीत पवार यांच्या विमान अपघातात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्यात आले होते. या व्हिडीओ काही दिवसांत सुमारे दिड लाख फ्लोवर्स मिळाले होते.

या व्हिडीओच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने अजीत पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांची बदनामी केली होती. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सायबर सेलने संबंधित व्हिडीओ सोशल मिडीयावरुन डिलीट करुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी बोगस आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करुन अजीत पवार यांच्या विमान अपघाताची चुकीची माहिती अपलोड करुन मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

तपासात हा व्हिडीओ जालन्यातून सोशल मिडीयावरुन व्हायरल झाला होता. त्यामुळे या व्यक्तीचा सायबर सेलने शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन या पथकाला संबंधित व्हिडीओ उद्धव कापसे यानेच व्हायरल केल्याचे समजले होते. ही माहिती प्राप्त होताच सोमवारी रात्री उशिरा या पथकाने जालना येथून उद्धवला ताब्यात घेतले होते.

तपासात उद्धव हा मूळचा जालन्याच्या बुट्टेगावचा रहिवाशी असून त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिथेच तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. त्याला दोन बहिणी असून त्या विवाहीत आहेत. अजीत पवार यांच्या अपघातानंतर विविध न्यूज चॅनेलला आलेले व्हिडीओ एकत्र करुन त्याने एआयच्या माध्यमातनू एक आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला होता. त्यात त्याने अजीत पवार यांच्या विमान अपघातात अनेक वादग्रस्त विधान करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते. चौकशीदरम्यान त्यानेच संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने हा व्हिडीओ कोणाच्या सांगण्यावरुन बनविला होता. अजीत पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीमागे त्याचा काय उद्देश होता. त्यासाठी त्याच्यावर कोणी दबाव आणला होता, त्याला कोणी आर्थिक मदत केली का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page