साडेचौदा लाखांच्या सोन्याच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक
फ्लॅटसाठी गहाण ठेवलेल्या दागिन्यांचा अपहाराचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – साडेचौदा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या अपहारप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस संमतानगर पोलिसांनी अटक केली. रौशन राधामोहन केसरी असे या आरोपीचे नाव असून पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
चंदन पलकधारी निशाद हे कांदिवलीतील आकुर्ली रोड, हनुमाननगर परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. याच परिसरात विजयलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे एक शॉप असून त्याचा मालक आशिष गिरीधारीलाल सोनी आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. अनेकदा ते त्याच्याच दुकानातून सोन्याचे दागिने खरेदी करत होते. गेल्या वर्षी त्यांच्या भावाचे लग्न झाले होते तर त्यांना दोन मुले झाले होते. त्यामुळे चाळीतील रुम त्यांना लहान पडत होता. त्यासाठी ते चाळीतच दुसर्या रुमचा शोध घेत होते. जानेवारी २०२६ रोजी त्यांना नौरंगवाडीतील एक रुम पसंद पडला होता. त्याची किंमत २४ लाख रुपये होती. त्यासाठी त्यांनी एक अर्थपुरवठा करणार्या खाजगी कंपनीतून दहा लाखांचे कर्ज घेतले होते.
उर्वरित पंधरा लाखासाठी ते त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची विक्री करणार होते. त्यामुळे ते त्यांच्याकडील सोने घेऊन आशिष सोनीकडे गेले होते. सर्व दागिन्यांची पाहणी केल्यानंतर त्याने त्यांना दागिन्यांचे १४ लाख ६५ हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. ठरल्याप्रमाणे त्याने त्यांना १४ लाख ६५ हजाराचा एक धनादेश देऊन त्याच्याकडील सर्व दागिने घेतले होते. ९ फेब्रुवारीला ते धनादेश बँकेत टाकण्यापूर्वी आशिष सोनीकडे गेले होते. यावेळी त्याने त्यांना धनादेश बॅकेत डिपॉझिट करु नका असे सांगून त्यांना सर्व पेमेंट कॅशमध्ये देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांनी धनादेश बँकेत डिपॉझिट केला नाही.
मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नाही. चौकशीनंतर त्याने त्यांचे दागिने विक्रीसाठी प्रकाश जैन या व्यापार्याकडे दिले आहे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी प्रकाश जैनला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. काही दिवसांनी कॉल केल्यानंतर प्रकाश जैनने आपण आशिष सोनी नावाच्या कोणीही ज्वेलर्स व्यापार्याला ओळखत नाही. त्याने त्याला कुठलेही दागिने विक्रीसाठी दिले नाही असे सांगितले. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे ते आशिष सोनीच्या ज्वेलर्स शॉपमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना शॉप बंद असल्याचे दिसून आले.
आशिष सोनी हा ज्वेलर्स शॉप बंद करुन पळून गेला होता. विक्रीसाठी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे पेमेंट न करता, दिलेले दागिने परत न करता ओशिष सोनी पळून गेल्याने त्यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
तपासादरम्यान या गुन्ह्यांत रौशन केसरी याचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेश मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या आठ महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रौशन केसरी याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने त्याचा गुन्ह्यांत सहभाग असल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.