प्रोटेक्शन मनीच्या नावाने खंडणीसाठी धमकाविणार्‍या दोघांना अटक

८० लाखांची मागणी करुन पहिला हप्ता घेताना कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – विकासकाकडून प्रोटेक्शन मनी म्हणून ८० लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली. पोलिसांनी त्या दोघांकडून पैशाची बॅग आणि ४ मोबाईल हस्तगत केले आहेत.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. २०२३ मध्ये दोघांच्या माध्यमातून १७. ५ हेक्टर जमीन खरेदी केली. खनिज उत्तखनन प्रक्रिया कामासाठी ग्रामसभा ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. वाडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतचे तत्कालीन सदस्य आणि विद्यमान उप सरपंच याची एकाच्या माध्यमातून भेट घेतली. ग्रामसभा ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र जरी मिळाले असले तरी आम्ही स्थानिक भूमिपुत्र असून प्रोटेक्शन मनी म्हणून एक कोटी रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय काम सुरु होऊ देणार नाही असे धमकावण्यात आले. तडजोडअंती ८० लाख रुपये देण्यास तक्रारदार याने होकार दिला. त्यानंतर दोनजण तक्रारदार याना पैशासाठी वारंवार फोन करत होते. तक्रारदार याना काम सुरु करायचे असल्याने त्याने टप्प्या टप्याने ३५ लाखांची रक्कम दोघांना दिली.

पैसे दिल्यावर तक्रादार याना ग्रामसभा ठराव आणि ना हरकत प्रमाणपत्र बाबत विनंती केली. त्या दोन्ही परवानगी घेऊन त्याची प्रत वन विभागाच्या अधिकाऱ्याना देण्यात आली. त्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयातून देण्यात आले नसल्याचे उघड झाले. त्या प्रतीबाबत विचारणा केली असता दोघांनी तक्रारदार याना खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन वारंवार खंडणी मागू लागले. १२ ऑगस्ट ला खंडणीच्या रक्कमेतील ५ लाख रुपये एकाच्या कार्यालयात पाठवली. त्यानंतर काही दिवसांनी त्याना पुन्हा खंडणीच्या रक्कमेबाबत विचारणा केली. २ सप्टेंबरला तीन ते चार जण हे तक्रारदार याच्या कार्यालयात आले. त्याने त्याची नावे सांगितली. एकाने कमरेला खोचलेले पिस्तूल काढून पैशाबाबत चर्चा सुरु केली.

एनओसीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी दिली. वारंवार खंडणीच्या रक्कमेबाबत विचारणा होऊ लागली. त्यानंतर तक्रारदार याने गुन्हे शाखेच्या युनिट ९ मध्ये जाऊन तक्रार दाखल केली.तपासासाठी एक पथक तयार केले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अंधेरी येथील एका हॉटेल मध्ये सापळा रचला. हॉटेल मध्ये खंडणीची रक्कम घेण्यासाठी आलेल्या दोघांनी तक्रारदार याच्याकडे पैशाबाबत विचारणा केली. त्यानंतर पैशाची बॅग एकाकडे दिली. बॅग खाली ठेवल्यावर पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. तसेच पोलिसांनी खंडणीची रक्कम ताब्यात घेतली. खंडणीची रक्कम स्वीकारल्या प्रकरणी दोघांना गुन्हे शाखेने अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page