ताडदेव येथील अपघातात 60 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू

अपघातानंतर पळून गेलेल्या बाईकस्वाराला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2026
मुंबई, – भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात बाईकवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एका 60 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ताडदेव परिसरात घडली. बाबू फैईमुद्दीन शेख असे या मृत वयोवृद्धाचे नाव असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी प्रजेश प्रसाद शेट्टी या बाईकस्वाराला ताडदेव पोलिसांनी अटक केली. प्रजेश हा परळ येथे राहत असून हॉटेल मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अक्रम बाबू शेख हे ताडदेवच्या हाजीअली रोडवर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. अक्रमसह त्यांचे वडिल बाबू शेख यांचा किरकोळ फेरीवाल्याचा व्यवसाय आहे. शनिवारी रात्री दहा वाजता ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांची आतेबहिण सिमरन हिने त्यांना फोन करुन त्यांचे वडिल बाबू शेख यांना एका बाईकस्वाराने धडक दिली असून त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे के. के रोड, सुलभ शौचालयाजवळ गेले होते. जखमी झालेल्या बाबू यांना त्यांनी तातडीने टॅक्सीतून नायर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रात्री अकरा वाजता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

यावेळी आरोपी बाईकस्वाराला ताब्यात घेऊन पोलीस पथक पोलीस ठाण्यात आले होते. तिथे त्यांना आरोपीचे नाव प्रजेश शेट्टी असल्याचे समजले. प्रजेश हा परळ येथे राहत असून एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता. शनिवारी रात्री भरवेगात बाईक चालविण्याचा प्रयत्नात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने बाबू शेख यांना धडक दिली होती. अपघातानंतर जखमी बाबू यांना वैद्यकीय उपचार न देता तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता तो पळून गेला होता,

मात्र त्याला काही तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही माहिती पोलिसांना प्राप्त होताच अक्रम शेख याने त्याच्यविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर प्रजेश शेट्टी याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. अपघाताच्या वेळेस त्याने मद्यप्राशन केले होते याचा अहवाल आल्यानंतर खुलासा होणार आहे. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page