राज्य पोलीस दलातील पाच आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

श्रीकांत परोपकारी यांची मुंबईच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मे 2026
मुंबई, – राज्य पोलीस दलातील पाच आयपीएस अधिकार्‍यांची मंगळवारी गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. त्यात श्रीकांत परोपकारी यांची मुंबई शहराच्या पोलीस उपायुक्तपदी तर अरविंद साळवे यांची दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीचे सत्र सुरु आहे. मंगळवारी 26 मेला गृहविभागाचे सह सचिव सुग्रीव धपाटे यांनी आणखीन चौदा आयपीएस अधिकार्‍यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहे. या अधिकार्‍यांना नव्याने पोस्टिंग देण्यात आली आहे. त्यात बदलीच्या प्रतिक्षेत असलेले अरविंद चावरिया यांची मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बलात पोलीस उपमहानिरीक्षक तर श्रीकृष्ण कोकाटे यांची नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक, मुंबईच्या राज्य राखीव पोलीस बलात पोलीस उपमहानिरीक्षक विनिता साहू यांची नागपूरच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त, नाशिक महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक अरविंद साळवे यांची मुंबईच्या दशहतवाद विरोधी पथकाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची मुंबई शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर नऊ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांची नवी मुंबई येथे झालेली बदली रद्द करुन त्यांना पुन्हा ठाणे शहर दाखविण्यात आले आहे. पुण्याचे पीएमआरडीएचे पोलीस अधिक्षक अमोल झेंडे यांची मिरा-भाईंदर-वसई-विरार येथील बदली रद्द करुन पुन्हा त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. वायरलेस कोस्टल डिव्हीजनचे पोलीस उपायुक्त निलेश सोनावणे यांची बदली रद्द करुन ठाण्यातील महामार्ग सुरक्षा पथक, ठाण्याच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधिक्षक रुपाली अंबुरे यांची पोलीस अधिक्षक-नवी मुंबई डायल 112, नांदेडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे यांची छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग, हिंगोली राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक बाराचे समादेशक स्वाती भोर यांची सांगली पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य, मुंबईच्या पोलीस उपायुक्त कविता नेरकर यांची राखीव पोलीस बल गट क्रमाक बाराचे समादेशक, पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिक्षक वैशाली माने यांची मिरा-भाईंदर-वसई-विरारच्या पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पोलीस अधिकार्‍यांनी त्यांच्या नव्याने पोस्टिंग मिळालेल्या जागी तातडीने रुजू होण्याचे आदेश गृहविभागाकडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page