खाऊसाठी पैसे देण्याचा बहाणा करुन आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार

गुन्हा दाखल होताच ६४ वर्षांच्या आरोपी वयोवृद्धाला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जून २०२६
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) – खाऊसाठी पैसे देण्याचा बहाणा करुन घरी आलेल्या एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच शेजारीच राहणार्‍या एका वयोवृद्ध अश्‍लील चाळे करुन लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ६४ वर्षांच्या वयोवृद्ध आरोपीस आरे पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

३० वर्षांची तक्रारदार महिला ही गोरेगाव परिसरात राहत असून घरकाम करते. आठ वर्षांची पिडीत तिची मुलगी असून तिच्याच शेजारी आरोपी राहतो. तिची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना आरोपीने तिला खाऊ खाण्यासाठी वारंवार पैसे दिले होते. पैसे देताना तो तिच्याशी साधून अश्‍लील चाळे करत होता. तिचे कपडे काढून तिच्याशी नकोसे कृत्य करत होता. १ मार्च ते ९ जून २०२६ या कालावधीत त्याने तिच्याशी अनेकदा अश्‍लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नको म्हणून तो तिला मारहाण करण्याची धमकी देत होती. त्यामुळे पिडीत मुलगी प्रचंड घाबरली होती.

तिने हा प्रकार कोणालाही सांगितली नव्हती. मंगळवारी हा प्रकार पिडीत मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. ही माहिती ऐकल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने आरे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी वयोवृद्धाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मंगळवारी रात्री त्याला अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पिडीत आणि आरोपी शेजारीच राहत असल्याने एकमेकांच्या परिचित आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page