बोगस कंपन्यांच्या नावाने पेमेंट करुन कंपनीची १.३३ कोटीची फसवणुक

माजी आर्थिक मॅनेजरसह पत्नीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१५ जुलै २०२६
मुंबई, – कंपनीशी काहीही संबंध नसताना वेंडर असल्याचे भासवून बोगस कंपन्याच्या नावाने पेमेंट करुन कंपनीच्या माजी आर्थिक मॅनेजरने १ कोटी ३३ लाख रुपयांचा आर्थिक गैरवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रार अर्जावरुन माजी आर्थिक मॅनेजर संदीप गोपाळ गोरीवले व त्याची पत्नी साईली गोरीवले यांच्याविरुद्ध सहार पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कपंनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संदीपने आपल्या अधिकार्‍याचा गैरव्यवहार करुन ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

भाविक विरजीभाई गज्जर हे त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील शहिद भगतसिंग कॉलनीत राहतात. ते सध्या बंगलोरच्या जॉईट ट्रिप हॉस्पिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सबसिडरी कंपनी एव्हीसर्व एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत आर्थिक संचालक म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी मुंबईसह अहमदाबादच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर लॉंज, रेस्ट्रॉरंट, कॅण्टीन आणि वेले पार्किंगमध्ये सेवा देते. त्यांच्यावर कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची जबाबदारी आहे. फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीत रुजू झाल्यानंतर त्यांना कंपनीत आर्थिक व्यवहाराचे कुठलेही रेकॉर्ड अपडेट नसल्याचे दिसून आले नाही. कंपनीत संदीप गोरीवले हा आर्थिक मॅनेजर म्हणून काम पाहत होता. त्यामुळे त्यांन त्याच्याकडे आर्थिक व्यवहाराची माहितीसह कंपनीच्या लॅपटॉप आणि मोबाईलची मागणी केली होती. मात्र तो वेगवेगळे कारण सांगून ही माहिती सांगण्यास टाळाटाळ करत होता.

याच दरम्यान एप्रिल २०२५ रोजी त्याने कंपनीचा राजीनामा दिला होता. हा प्रकार संशयास्पद वाटत असल्याने त्यांनी त्यांच्या टिमकडून २०२३ पासूनच्या कंपनीच्या सर्व आर्थिक व्यवहाराची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. त्यात सप्टेंबर २०२३ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कंपनीच्या बँक खात्यातून काही अधिकृत वेंडरच्या नावाने ऑनलाईन पेमेंट झाल्याचे दिसून आले होते. मात्र प्रत्यक्षात संबंधिम पेमेंट वेंडरच्या नावानं दुसर्‍या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते. जवळपास तीस वेंडरच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्यामुळे त्या सर्वांना कंपनीकडून संपर्क साधण्यात आला होता, यावेळी त्यांनी त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली नसल्याचे सांगितले.

तपासात संदीप गोरीवले याने त्यांच्या वेंडर यादीत बोगस नोंद करुन दर्शना आणि आरएसएसजी ऍण्ड असोशिएटस वेंडरचे नाव ऍड केले होते. पेमेंट करताना त्यांचे बोगस जीएसटी क्रमांक आणि पॅन क्रमांक देण्यात आली. या दोन्ही कंपन्या संदीपची पत्नी साईल गोरीवले हिच्या मालकीचे होते. या दोन्ही कंपन्यात त्यांच्या कंपनीचे अधिकृत वेंडर नसताना त्यांच्या बँक खात्यात पेमें झाले होते. अशा प्रकारे संदीप गोरीवले याने डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२५ या कालावधीत कंपनीच्या १ कोटी ३३ लाख ५३ हजार ५३९ रुपयांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच भाविक गज्जर यांनी वरिष्ठांनी त्यांचा अहवाल सादर केला होता.

या आर्थिक गैरव्यवहाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत भाविक गज्जर यांना कंपनीच्या वतीने पोलिसांत तक्रार करण्याची सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सहार पोलिसांना सांगून कंपनीचा माजी आर्थिक मॅनेजर संदीप गोरीवले आणि त्याची पत्नी साईल गोरीवले यांच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून कंपनीच्या पैशांचा वैयक्तिक फायद्यासाठी गैरव्यवहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page