भायखळा पोलीस ठाण्यातील आगीने एकच खळबळ

आगीत कोणतीही जिवीतहानी; काही कागदपत्रे भास्मसात

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जुलै २०२६
मुंबई, – मध्य परिमंडळातील भायखळा पोलीस ठाण्यात आज रात्री आग लागली. अग्निशमन दलाने ही आग काही वेळातच विझवली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत नेमके कोणत्या कोणत्या केसेसचे पेपर जळून खाले हे स्पष्ट झालेले नाही. २०२२ मध्ये खेरवाडी पोलीस ठाण्यात आग लागली होती. त्या आगीत एका पोलीस गंभीर जखमी झाला होता.

दक्षिण मुंबईतील भायखळा पोलीस ठाणे हे महत्वाचे पोलीस ठाणे मानले जाते. ब्रिटिश कालीन स्थापत्य शैलीची झलक असणारी ही ऐतिहासिक वास्तू आहे. वीर जिजामाता भोसले उद्यान, माझगाव न्यायालय, भंडारवाडा जलाक्षय भायखळा, घोडपदेव, ताडवाडी, हाजीकासम आदी परिसर या पोलीस ठाण्या अंतर्गत येतो. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ५ लाख लोकसंख्या आणि २.७ चौरस किलो मीटर क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. या पोलीस ठाण्यात अनेक महत्वाच्या केसेस दाखल आहेत. तसेच पोलीस ठाण्याच्या शेजारी आयपीएस आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची घरे आहेत.

शहरात जास्त पाऊस पडल्यास या पोलीस ठाण्यात गुडघ्या एवढे पाणी साचते. आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची बातमी वाऱ्या सारखी पसरली गेली. रात्र पाळी साठी आलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्यावर रुजू होत असतानाच अचानक आग लागली. या घटनेची माहिती समजताच अग्निशनम दलाचे जवान घटनास्थळी आले.

अग्निशमन दलाने काही वेळातच आग विझवली. या आगीत नेमके कोणत्या केसेस चे पेपर जळाले हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस ठाण्यासमोरील उड्डाणपुलावरून नागपाडाच्या दिशेने जाणारे नागरिक मोटारसायकल थांबवून आगीचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page