२४ तासांत फसवणुकीची १.०२ कोटीची रक्कम वाचविण्यात यश

शेअर ट्रेडिंग-फेडेक्स कुरिअरच्या माध्यामतून फसवणुक झाली होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – भरपूर नफा मिळवून देतो असे सांगून शेअर ट्रेडिंग आणि फेडेक्स कुरिअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने वांद्रे आणि कांदिवलीतील व्यक्तींची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे चार कोटीची ऑनलाईन फसवणुक केली, मात्र १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधल्यानंतर २४ तासांत फसवणुक झालेली एक कोटी दोन लाख रुपयांची रक्कम वाचविण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. काही तासांत ही रक्कम परत मिळाल्याने तक्रारदारांनी सायबर सेल पोलिसांचे आभार व्यक्त केले आहेत.

२५ एप्रिलला सायंकाळी साडेसात वाजता सायबर हेल्पलाईनवर प्राप्त विविध तक्रारीमध्ये शेअर ट्रेडिंग आणि फेडेक्स कुरिअरच्या माध्यमातून वांद्रे आणि कांदिवलीतील दोन व्यक्तींची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देतो असे सांगून सायबर ठगांनी १ कोटी ८० लाख आणि २ कोटी २९ लाख रुपये अशी चार कोटी नऊ लाखांची फसवणु केली होती. अशाच प्रकारे बोरिवलीतील अन्य एका व्यक्तीची कुरिअर स्कॅमप्रकरणी फसवणुक झाली होती. या फसवणुकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, बावस्कर, महिला पोलीस हवालदार सिंग, पोलीस हवालदार शिखरे, महिला पोलीस शिपाई दळवी, शिंदे, पोलीस शिपाई भावसार यांनी तात्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करुन संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती, त्या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी १ कोटी २ लाख ६६ हजार ०९५ रुपयांची रक्कम संबंधित बँक खात्यात होल्ड करण्यात आली होती. २४ तासांत तातडीने हालचाल केल्यांनतर ही रक्कम फ्रिज करण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले. लवकरच ही रक्कम संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page