खेळता खेळता एकमेकांशी अश्लील चाळे करणे महागात पडले
तेरा ते पंधरा वयोगटातील चार अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – चेंबूर येथे एका बारा वर्षांच्या मुलावर अनैसंगिक लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तेरा ते पंधरा वयोगटातील चार अल्पवयीन मुलांविरुद्ध आरसीएफ पोलिसांनी भादवीसह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या चारही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. दर शुक्रवारी या मुलांचे ंसमपुदेशन केले जाणार आहे. खेळता खेळता ते सर्वजण अश्लील चाळे करत होते, मात्र एका मुलाच्या मोबाईलमध्ये संबंधित वादग्रस्त फोटोसह व्हिडीओ सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे खेळताना एकमेकांशी अश्लील चाळे करणे या चारही मुलांना चांगलेच महागात पडले आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवारशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला.
यातील तक्रारदार चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून त्यांना बारा वर्षांचा मुलगा आहे. याच इमारतीमध्ये आरोपी मुले असून ते सर्वजण चांगले मित्र आहेत. सर्वजण नियमित इमारतीच्या टेरेसवर खेळायला जातात. २१ एप्रिलला ते सर्वजण टेरेसवर खेळण्यासाठी गेले होते. यावेळी खेळताना ते सर्वजण एकमेकांशी अश्लील चाळे करत होते. त्याचे त्यांनी काही व्हिडीओ आणि फोटो काढले होते. दोन दिवसांपूर्वी पिडीत मुलाच्या मोबाईलमध्ये ते फोटो त्याच्या भावाने पाहिले आणि त्याने ही माहिती त्याच्या वडिलांना सांगितली. ते फोटो पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी आरोपींच्या पालकांना ते फोटो आणि व्हिडीओ दाखवून मुलांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातील चर्चेनंतर ते सर्वजण पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी घडलेला प्रकार वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदार पवार यांना सांगितला. या पालकांनी मुलांची समजूत काढण्याची विनंती करुन पोलिसांत तक्रार करण्यास नकार दिला होता, मात्र पोलिसांनी स्वतहून संबंधित फोटोसह व्हिडीओची दखल घेत तेरा ते पंधरा वयोगटातील चारही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या मुलांना नंतर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यांनी पिडीत मुलावर अनैसगिंक लैगिंक अत्याचार केला नसल्याचे सांगून ते सर्वजण टेरेसवर डॉक्टर डॉक्टर खेळत असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र खेळताना एकमेकांशी अश्लील चाळे करणे या मुलांच्या अंगाशी आले होते. त्यामुळे त्यांची समजूत काढून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. या मुलांचे दर शुक्रवारी समपुदेशन केले जाणार आहे. तसेच यापुढे अशा प्रकारे अश्लील खेळ खेळू नये अशी त्यांना सक्त ताकिद देण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.