बीएसईच्या सीईओचा डिपफेक व्हिडीओ व्हायरल

दक्षिण प्रादेशिक सायबर सेलकडून तपास सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – सिनेअभिनेता आमीर खान आणि रणवीर सिंग याच्यानंतर आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंजे एमडी आणि सीईओ सुंदररमण रामामूर्ती यांचे सोशल मिडीयावर डिपफेक व्हिडीओद्वारे बोगस जाहिरात करुन सर्वसान्य नागरिकांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दक्षिण प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे हे तपास करत आहेत.

अक्षित अशोक जैन हे लोअर परेल येथील ना. म जोशी मार्ग परिसरात राहतात. १७ एप्रिलला फेसबुकवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ सुंदररमण रामामूर्ती हे बोलत असल्याचे दाखवून ते लोकांना शेअरमधील स्टॉक, करन्सी, गोल्ड आणि फॉरेक्स मार्केटच्या गुंतवणुकीबाबत टिप देणार आहे असा एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशा प्रकारे डिपफेक व्हिडीओ व्हायरलद्वारे अज्ञात फेसबुकधारकाने फसवणुकीच्या उद्देशाने बोगस जाहिरात प्रसारित करुन सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार नंतर सुंदररमण रामामूर्ती यांच्या निदर्शनास येताच त्यांच्या वतीने अक्षित जैन यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१ भादवीसह सहकलम ६६ क, ६६ ड आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या फेसबुक अकाऊंटवरुन हा डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाला, त्या व्यक्तीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन त्रिमुखे हे शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page