सनदी लेखापालाच्य घरी मोलकरणीची पावणेसोळा लाखांची हातसफाई
आरोपी मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२६
मुंबई, – पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासाठी घरकामासाठी बोलाविलेल्या मोलकरणीने सनदी लेखापालाच्या घरातील पावणेसोळा लाखांच्या हिरेजडीत सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आशा राजू ब्राम्हणे या संशयित मोलकरणीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
हा प्रकार शुक्रवारी १८ सप्टेंबरला सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबाराच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरेश शांतीलाल अचांलिया हे सनदी लेखापाल असून ते अंधैरीतील अंधेरी-कुर्ला रोड, हॉटेल कोहीनूरजवळील सीटी स्केप अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांची सुरेश अचांलिया ऍण्ड कंपनी नावाची एक फर्म आहे. त्यांच्या घरी पर्युषण पर्व असल्याने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. घरी जास्त असल्याने त्यांनी त्यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी काम करणार्या आशा ब्राम्हणे हिला कामासाठी बोलावून घेतले होते. १२ सप्टेंबरला तिच्याशी कामाविषयी चर्चा केल्यानंतर ती १३ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर असे दोन दिवस त्यांच्याकडे कामासाठी आली होती.
१५ सप्टेंबरला तिने वैयक्तिक कारणावरुन कामावर येणार नाही असे सांगितले होते. त्यानंतर ती बुधवारी १६ सप्टेंबरला कामावर आली होती. त्याच दिवशी पर्युषण पर्वांचा शेवटचा दिवस असल्याने त्यांच्या घरी अथाई तपस्या पारण कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांच्य पत्नीने घरातील हिरेजडीत सोन्याचे दागिने परिधान केले होते. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम संपल्यानंतर तिने सर्व दागिने लाकडी कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवले होते. यावेळी तिने ड्राव्हर लॉक केला नवहता.
१७ सप्टेंबरला आशा कामावर आली नाही. मात्र दुसर्या दिवशी दिवसभर काम करुन ती निघून गेली होती. शनिवारी त्यांच्या पत्नीने लाकडी ड्राव्हरमधील हिरेजडीत दागिन्यांची पाहणी केली असात त्यात तिला ज्वेलरी बॉक्स अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. दागिन्यांची पाहणी केल्यानंतर तिला सव्वालाखांची एक हिरेजडीत अंगठी, अडीच लाखांची सालीटर डायमंडची अंगठी, बारा लाखांचा हिरेे, मोती, रुबीजडीत सोन्याच्या तुटलेला नेकलेस आणि एक कर्णफुल असा पावणेसोळा लाखांचा मुद्देमाल मिसिंग असल्याचे दिसून आले. तिने कपाटात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला,
मात्र तिला कुठेच दागिने सापडले नाही. त्यामुळे सुरेश व त्यांच्या पत्नीने घरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यांना आशा ही घरात संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आली. तिनेच पावणेसोळा लाखांच्या हिरेजडीत दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन सुरेश अचांलिया यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आशा ब्राम्हणे हिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आशाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.