आठ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दिल्लीतील व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
प्लास्टिक रॉ मटेरियलसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – चीन देशातील विविध खाजगी कंपनीतून स्वस्तात प्लास्टिक रॉ मटेरियल देण्याचे आमिष दाखवून दिल्लीतील एका व्यावसायक ठगाने व्यावसायिक जोडप्याची ७ कोटी ९१ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गौरव गुप्ता या व्यावसायिकाविरुद्ध जुहू पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
सिमा दिपेश जनानी ही महिला व्यावसायिक असून ती जुहू परिसरात राहते. तिची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी प्लास्टिक रॉ मटेरियल आयात करुन स्थानिक विभागात विक्री करण्याचे काम करते. गेल्या पाच वर्षांपासून ती कंपनी चालवत असून कंपनीची ती मालकिण आहे. तिचे पतीही व्यावसायिक असून त्यांची स्वतची कंपनी आहे. व्यवसायानिमित्त त्यांना विविध शहरात मिटींगसाठी तसेच व्यावसायिकांच्या कार्यक्रमासाठी जावे लागत होते. अशाच एका कार्यक्रमांत तिची दिल्लीचा रहिवाशी असलेल्या गौरव गुप्ताशी ओळख झाली होती. त्याने तो व्यावसायिक असून त्याचा प्लास्टिक, केमिकल्स, ड्रायफ्रुट्स, सुपारी आदींचा व्यवसाय असल्याचे सांगितले होते. दिल्लीतील मॉडेल टाऊन, टिळक बाझार परिसरात त्याच्या कंपनीचे कार्यालय होते.
ओळखीनंतर त्यांच्यात प्लास्टिक रॉ मटेरियलचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु झाला होता. अनेकदा तो त्यांच्या कंपनीकडून रॉ मटेरियल घेत होता. याच दरम्यान त्याने त्यांना त्याची चायना देशातील काही कंपन्यांशी ओळख असून या कंपनीतून त्यांना स्वस्तात प्लास्टिक रॉ मटेरियल देतो असे सांगितले होते. सिमा जनानीला तिच्या व्यवसाय वाढीसाठी रॉ मटैरियलची गरज होती. त्यामुळे तिने त्याच्यावर विश्वास ठेवून चायना देशातून रॉ मटेरियल आयात करण्याचा निर्णय घेतला होता.
ठरल्याप्रमाणे तिने त्याला रॉ मटेरियरलसाठी टप्याटप्याने ७ कोटी ९१ लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना रॉ मटेरियलचा पुरवठा केला नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कज्ञारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने तिच्या कंपनीच्या एका अधिकार्याला गौरवच्या मशिदबंदर येथील कार्यालयात पाठविले होते, मात्र तिथे त्याची कंपनीत अस्तिस्ताव नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे सिमा ही तिच्या पती दिपेशसोबत दिल्लीला गेले होते. यावेळी गौरवने दोन महिन्यांत पैसे देतो असे सांगितले,
मात्र त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्यामुळे काही दिवसांनी ते दोघेही पुन्हा त्याच्या दिल्लीतील घरी गेले होते. यावेळी त्याने त्यांना घरातून हाकलून दिले. परत आल्यास पोलिसांना फोन करुन त्याच्या घरी जबदस्तीने प्रवेश केल्याचे सांगून त्यांना अटक करण्यास प्रवृत्त करु अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर ते दोघेही मुंबईत आले आणि त्यांनी घडलेला प्रकार जुहू पोलिसांना सांगून गौरव गुप्ता याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध रॉ मटेरियलसाठी घेतलेल्या ७ कोटी ७९ लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याच्या अटकेसाठी लवकरच जुहू पोलिसांची एक टिम दिल्लीला जाणार आहे.