जैश-ए-मोहम्मद दशतवादी संघटनेच्या संशयित रेपिडो चालकास अटक

आरोपीच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षैपार्ह-वादग्रस्त कॅमेट्स सापडले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – भारत सरकारने बंदी घेतलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दशहतवादी संघटनेच्या समर्थक असलेल्या संशयित रेपिडो चालकास काळाचौकी युनिटच्या दशहतविरोधी पथकाने अटक केली. मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर असे या ३३ वर्षांच्या चालकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध १९६ (१) कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून त्यात अनेक आक्षेपार्ह-वादग्रस्त कमेट्स असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तौसिफ रसुल मुल्ला हे दशहतविरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक कार्यरत आहेत. दशतवादी कारवायांशी संबंधित व्यक्तींची माहिती काढत असताना या युनिटला मोहम्मद हसन या व्यक्तीविषयी एक गोपनीय माहिती समजली होती. तो माहीमच्या मेट्रो रेल्वे स्टेशनजवळील एल. जे रोड, लक्ष्मी इमारतीच्या तळमजल्यावर राहत असून रेपिडो चालक म्हणून काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून तो पाकिस्तानी इंटेलिजन्ट ऑपरेटरच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी शुक्रवारी या पथकाने माहीम परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद हसनला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

या मोबाईलची पाहणी करताना तो फेसबुक, व्हॉटअप, इंटाग्राम, एक्स, टेलिग्राम आदी विविध सोशल मिडीया ऍपच्या आधारे धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट, कायदा व सुव्यवस्था बिघडेल तसेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याच्या कारवायात सक्रिय असल्याचे दिसून आले होते. त्याच्या सोशल अकाऊंमध्ये हमीद शरीफ नावाच्या एका व्यक्तीचे अकाऊंट होते. त्याने त्याच्या अकाऊंटमध्ये काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट केल्याचे दिसून आले. टेलिग्राम अकाऊंटमध्ये हसन शेख याचे अकाऊंट असून एका ग्रुपमध्ये तो ऍडमिन असल्याचे दिसून आले. त्यात तीन सदस्य होते. भारताने बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद याचे काही ऑडिओ क्लिप होते.

ते ऑडिओ क्लिप १ जून २०२६ रोजी अपलोड केल्याचे दिसून आले. त्याची एक लिंक ग्रुपमध्ये होती. पाकिस्तान पुरस्कृत आयबीएन-ए-कासिम या टेलिग्राम चॅनेलचा सबस्क्राय असल्याचे दिसून आले.हसन शेख या नावाच्या अकाऊंटची पाहणीदरम्यान त्यात काही आक्षेपार्ह पोस्ट नव्हती. त्याच्या मोबाईलमध्ये ३९ स्क्रिनशॉट घेण्यात आले होते. त्यातील बहुतांश पोस्ट आक्षेपार्ह होते. ते स्क्रिनशॉट त्याने मोबाईलच्या एका फोल्डरमध्ये जतन केले होते. त्याचे प्रिंट काढून नंतर त्यावर मोहम्मद हसन अख्तरची स्वाक्षरी घेण्यात आली होती. ४ मे ते १८ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत त्याने त्याच्या विविध सोशल मिडीया अकाऊंटवरील विविध पोस्टवर कट्टरपंथी विचारसरणीचया धार्मिक तेढ निर्माण करणार्‍या कमेंट्स केले होते.

त्याच्या टेेलिग्राम अकाऊंटवर इंडीयन मुस्लिम नावाने एक ग्रुप तयार करण्यात आला असून त्यात जैश-ए-मोहम्मद या दशहतवादी संघटनेचा प्रमुख मौलाना अजहर मसूद याचा बाबरी मशिदीसंदर्भात ऑडिओ क्लिप शेअर केले होते. त्यामुळे त्याची कृती दोन समाजामध्ये द्वेष, मत्सर, शत्रुत्व वाढविणे आणि एकोपा टिकण्यास बाधक असल्याचे दिसून येत होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध १९६ (१) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची सध्या एटीएसकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page