विविध शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या वयोवृद्धेच्या घरी चोरी
चोरीचा गुन्हा दाखल होताच आरोपी महिलेस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – राज्य शासनाच्या वन व महसूल विभाग, स्वच्छ भारत अभियानमध्ये आर्थिक सल्लागार तसेच राज्य पोलीस प्राधिकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी आदी विविध शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध महिलेच्या आजारपणाचा फायदा घेऊन कपाटातील सोन्याचे दागिने चोरी केल्याप्रकरणी जया अमीत सोलंकी या महिलेस आंबोली पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीचे काही दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे. पोलीस कोठडीनंतर तिला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
६९ वर्षांच्या सोनमस्मित मधुकर पाटील या वयोवृद्ध तक्रारदार महिला अंधेरीतील आंबोली, रमेशनगर, आरबीआय गिंताजली अपार्टमेंटमध्ये राहतात. तिचा मोठा मुलगा नॉर्वे तर लहान मुलगा पुण्यात वास्तव्यास आहे. ऑगस्ट २०१५ साली ती महसून आणि वन विभागातून निवृत्ती झाली. त्यानंतर सप्टेंबर २०१५ साली स्वच्छ भारत अभियानमध्ये आर्थिक सल्लागार तर सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत तिने राज्य पोलीस प्राधिकरणामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. सध्या सर्व सेवेतून सोनलस्मित पाटील या निवृत्त झाल्या असून अंधेरीतील फ्लॅटमध्ये एकट्याच राहतात. त्यांच्या घरी दोन महिला घरकामासाठी येतात.
जुलै २०२६ रोजी तिची स्पाईन सर्जरी झाली होती. त्यामुळे तिने भांगरम्मा बंबराय पुजारी या महिेलेस केअरटेकर म्हणून ठेवले होते. ती अंधेरीतील एमआयडीसी, चकाला परिसरात राहत होती. २० जुलै २०२६ ती तिच्याकडे कामासाठी येत होती. तिला तीन महिन्यांसाठी कामावर येण्यास सांगण्यात आले होते. घरातील तिची वागणुक संशयास्पद होती, त्यामुळे सोनलस्मिमने तिच्याविषयी ओम नमो एजन्सीच्या मालकाकडे तक्रार केली होती. मात्र दुसरी केअरटेकर महिला उपलब्ध नसल्याने त्यांनी तिलाच काही दिवस कामावर ठेवण्याची विनंती केली होती. २६ जुलेला प्रकृती बिघडल्याने सोनमस्मित यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले होते.
हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी तिने तिचे सर्व दागिने कपाटात सुरक्षित ठेवले होते. दागिने ठेवताना तिने तिला पाहिले होते. १ ऑगस्टला सोनमस्मित हॉस्पिटलमधून घरी आल्या. त्यानंतर १४ ऑगस्टपासून भांगरम्मा ही अचानक कामावर येणे बंद झाली होती. गणेशोत्सात तिने कपाटातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला कपाटात दागिने सापडले होते. तिने घरात सर्वत्र दागिन्यांचा शोध घेतला, मात्र तिला कुठेच दागिने सापडले नाही. त्यामुळे सर्व दागिन्यांची पाहणी केली असता तिला सोन्याच्या तीन बांगड्या, एक अंठी, हिरेजडीत अंगठी, कानातील स्टडस असा १ लाख ८५ हजाराचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले.
तिच्या घरी तिच्या घरकाम करणार्या महिलांसह भंगारम्मा यांच्या वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे त्यापैकी कोणीतरी दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी घरातील काम करणार्या महिलेची चौकशी सुरु केली होती. चौकशीत ही चोरी जया सोलंकी हिने केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीचे काही दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.