चोरीसाठी स्वतच्या अल्पवयीन वापर करणार्‍या दोन महिलांना अटक

हॉटेल-पबबाहेर हातचलाखीने मौल्यवान वस्तू चोरी करायचे

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – चोरीसाठी स्वतच्या अल्पवयीन मुलींना पुढे करुन चोरी करणार्‍या दोन महिलांना खार पोलिसांनी अटक केली. मिरा मुकेश वाघारी आणि आरती सुनिल खारवा अशी या दोघांची नावे असून त्या दोघीही खार परिसरातील रहिवाशी आहे. या महिला हॉटेल-पबबाहेर येणार्‍या ग्राहकांसह पादचार्‍यांना हेरुन टिश्यू पेपर विक्रीचा बहाणा करुन हातचलाखीने मौल्यवान वस्तू चोरी करुन पळून जात होते. यातील एका महिलेविरुद्ध यापूर्वीचे अशाच चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर दोन्ही महिलांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

मिताली दिलीप सोमय्या ही महिला कांदिवली येथे राहते. २४ ऑक्टोंबरला तिच्या एका मित्राचा वाढदिवस होता, त्यामुळे ती तिच्या मित्रांसोबत त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खार येथे आले होते. यावेळी तिच्या बॅगेत एक लाख वीस हजाराचा एक सोन्याचा एक ब्रेसलेट आणि चार हजाराची कॅश होती. एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर त्यांनी जेवण केले. जेवणानंतर ती तिची मैत्रिणीसोबत हॉटेलबाहेर आली. यावेळी तिथे दोन लहान मुली आल्या त्यांनी तिला त्यांच्याकडील टिश्यू पेपर विकत घ्या अशी विनंती केली, मात्र तिने टिश्यू पेपर घेण्यास नकार दिला. त्यानंतर ती तेथून निघाली आणि कारमध्ये बसली.

यावेळी तिने तिच्या पर्सची पाहणी केली असता त्यात सोन्याचे ब्रेसलेट आणि चार हजाराची कॅश नव्हती. तिने आजूबाजूला ब्रेसलेट आणि कॅशचा शोध घेतला, मात्र तिला ब्रेसलेट आणि कॅश मिळून आले नाही. त्यानंतर तिने खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी मिरा वाघारी आणि आरती खारवा या दोन महिलानंा ताब्यात घेतले.

चौकशीत त्यांनीच त्यांच्या दोन मुलींना टिश्यू पेपर विकत घेण्याचा बहाणा करुन मिताली सोमय्या हिच्या पर्समधील ब्रेसलेट आणि कॅश चोरी करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. चोरीसाठी त्या दोघीही स्वतच्या मुलींचा वापर करत होते. यातील मिराविरुद्ध यापूर्वीचे दोन गुन्हे दाखल आहेत तर आरतीचा पहिलाच गुन्हा आहे. त्या दोघींही खार पूर्वेला राहत असून चोरीसाठी खार पश्‍चिमेकडील हॉटेल, पबबाहेर टिश्यू पेपर विक्रीचे काम करते होते. त्यांच्या मुलींना चोरीसाठी पुढे करुन लोकांकडील कॅशसह इतर मौल्यवान वस्तू चोरी करत होते. तपासात आलेल्या माहितीनंतर या दोन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page