हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दुकलीस कोलकाता येथून अटक
पूर्ववैमस्नातून २२ वर्षांची हत्या करुन पळून गेले होते
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
११ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका दुकलीस सहार पोलिसांनी कोलकाता येथून अटक केली. अभिषेक शुक्ला आणि राज सिंग अशी या दोघांची नावे असून हत्येच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. पूर्ववैमस्नातून शिवम कनोजिया ऊर्फ गब्बर या २२ वर्षांच्या या दोघांनी त्यांच्या तीन सहकार्यांच्या मदतीने तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. हत्येनंतर पळून गेलेल्या या दोघांनाही दिड महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत इतर तिघेजण सहआरोपी असून त्यांची नावे अमीत चौधरी, अब्दुल रजाक आणि अभय झा अशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रोहित जयसिंग नेगी हा अंधेरीतील मरोळ पाईपलाईन, द ग्रेट इंदिरानगर परिसरात राहत असून तो एका नामांकित कॉलेजमध्े बीकॉमचे शिक्षण घेतो. मृत शिवमसह पाचही आरोपी एकाच वयाचे आहेत. ते सर्वजण एकाच परिसरात राहत असल्याने एकमेकांच्या परिचित आहेत. एक वर्षांपूर्वी अभिषेकसोबत रोहितचे क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. या वादानंतर त्यांच्यात प्रचंड हाणामारी झाली होती. प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी एकमेकांविरुद्ध तक्रार केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या घटनेनंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. ३० ऑगस्ट २०२६ रोजी रोहित हा शिवमसह इतर मित्रांसोबत आण्णावाडी ट्रक पार्किंगजवळ आले होते. तिथेच पाचही आरोपी मद्यप्राशन करत होते.
रोहितला पाहताच अभिषेकसह इतर चौघांनी शिवीगाळ करुन त्याच्याशी जुन्या वादातून भांडण सुरु केले होते. काही वेळानंतर त्यांनी त्याला बांबूने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवमने त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, त्यांन बाजूला करुन आपसांत वाद घालू नका असे समजू लागला होता. त्याचा राग आल्याने त्यांनी त्यालाही लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. याच दरम्यान त्यांनी बाईकमधून चाकू काढून शिवमवर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तिथे उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. हल्ल्यानंतर पाचही आरोपी पळून गेले होते. याप्रकरणी रोहित नेगी याच्या तक्रारीवरुन अभिषेक शुक्ला, राज सिंग, अमीत चौधरी, अब्दुल रजाकआणि अभय झा या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी हत्येसह गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना या कटातील मुख्य आरोपी अभिषेक आणि राज हे दोघेही कोलकाता येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहार पोलिसांची एक टिम कोलकाता येथे गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने हत्येच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अभिषेक शुक्ला आणि राज सिंग या दोघांना अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.