चौदा वर्षांच्या मुलीवर चौघांकडून सामूहिक लैगिंक अत्याचार

गुन्हा दाखल होताच अल्पवयीन मुलांसह चारही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – आंघोळ करताना व्हिडीओ असल्याची बतावणी करुन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित चार तरुणांनी सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह विनयभंग, पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच चारही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यात दोन सतरा वयोगटातील दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून या दोघांनाही डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. अठरा आणि बावीस वर्षांच्या दोन आरोपींना दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने सोमवार १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींनी पिडीत मुलीवर दोन वेळा सामूहिक लेगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बुधवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

पिडीत मुलगी चौदा वर्षांची असून ती कांदिवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहतो. यातील एक अल्पवयीन मुलगा तिचा परिचित असून तो तिथेच राहतो. शुक्रवारी ६ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता तो तिला भेटला होता. त्याने तिला तिचे आंघोळ करताना करताना व्हिडीओ असल्याचे सांगून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करु नये तसेच डिलीट करायचे असेल तर तिला त्याच्यासोबत यावे लागेल असे सांगितले. त्यामुळे ती त्याच्यासोबत कांदिवलीतील हनुमाननगर परिसरात गेली होती. तिथेच एका रुममध्ये आणल्यानंतर त्याने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. यावेळी इतर तीन तरुण उपस्थित होते.

काही वेळानंतर या चौघांनी तिला धमकावून तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. या अत्याचारानंतर त्यांनी तिला धमकावून हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तिचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करु असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी तिला घरी पाठविले होते. या घटनेनंतर मंगळवारी १० नोव्हेंबरला यातील एका आरोपीने तिला स्नॅपचॅटवर मॅसेज करुन तिचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्या घरी बोलावून घेतले होते. बदनामीच्या भीतीने ती तिथे गेली होती, त्यानंतर दोन आरोपींनी तिच्यावर पुन्हा आळीपाळीने सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता.

पाच दिवसांत चारही आरोपींनी तिचे अश्‍लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची, तिची बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन वेळा तिच्या मनाविरुद्ध सामूहिक लैगिंक अत्याचार केला होता. त्याचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. ती प्रचंड मानसिक नैराश्यात होती. अखेर तिने त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती समतानगर पोलीस ठाण्यात गेली आणि तिने घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. तसेच संबंधित चारही आरोपीविरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती.

या तक्रारीची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत चारही आरोपीविरुद्ध ६४ (२), आय(), (एम), ७० (२), ३५१ (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता, सहकलम ४, ६, १० पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना चारही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी पिडीत मुलीवर दोन वेळा सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली.

अटक आरोपींपैकी दोन आरोपी सतरा, तिसरा आरोपी अठरा तर चौथा बावीस वर्षांचा आहे. चारही आरोपींनी कट रचून पिडीत मुलीला ब्लॅकमेल करुन, तिची बदनामी करण्याची धम्की देऊन तिच्यावर सामूहिक लैगिंक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांना डोंगरी बालसुधारगृहात पाठविणयात आले तर इतर दोघांना दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page