मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मे २०२४
मुंबई, – वाचू आनंदे या संकल्पेतून मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकार्यासह कर्मचार्यासाठी नवीन ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. या नवीन ग्रंथालयाचा रेल्वे पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांना चांगला फायदा होणार आहे.
पोलीस आयुक्ताच्या संकल्पेतून मुंबई लोहमार्ग आयुक्तालयातील मुंबई सेंट्रल रेल्वे ठाण्यात नवीन नवीन ग्रंथालय निर्माण अभियानातर्ंगत १ मे २०२४ रोजी पोलीस निरीक्षक सतीश चिंचकर, किर्ती कॉलेजचे प्राचार्य अमेय महाजन आणि पोलीस निरीक्षक कुंभार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांच्या उपस्थितीत अतिथी यांनी दिप प्रज्वलन करुन ग्रंथालयाची फित कापून उद्घघाटन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना पुस्तक वाचनाचे महत्त्व पोलीस आयुक्तांच्या संकल्पेतून साकारत असलेले विविध उपक्रमांची माहिती दिली. पोलीस आयुक्त कार्यालयातून प्राप्त झालेली २५५ पुस्तके, पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी स्वयंस्फूर्तीने जमा केलेली ४५ पुस्तके अशी ३०० विविध विषयांची पुस्तके, चरित्र ग्रंथ, कादंबरी, सर्वसामान्य ज्ञान, विज्ञान, आरोग्यविषयक, ऐतिहासिक आदी विषयांची पुस्तके ठेवण्यात आली आहे. या पुस्तकांचा वाचनाचा लाभ सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी स्वतसाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी घ्यावा. वाचन संस्कृती वाढवावी आणि जोपासावी असे आवाहन केले. यावेळी पोलिसांना ग्रंथालय सभासद कार्डचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलिसांसह त्यांच्या कुटुंबियांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.