मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – वांद्रे येथे सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा खार पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी सहा महिलांची सुटका करुन त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करणार्या पाचजणांना अटक केली. शंकर विशुन यादव, रघु धनच्चू शर्मा, बाबूलाल जागो सिंग, मनोज जानकी यादव, छोटू ऊर्फ रमेश मंगर यदव अशी या पाचजणांची नावे असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जागेचा मालक जयराम फर्नाडिस याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. दुसरीकडे सहाही महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
वांद्रे येथील पिटर्स रोड, सेंट स्टेनिस्लॉस हायस्कूलजवळील बाबानगर, मिराकी हॉटेलच्या मागे सेक्स रॅकेट चालत असून तिथे वेगवेगळ्या राज्यातून आणलेल्या महिलांना काही पुरुषासोबत शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित आरोपींविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी तिथे एका बोगस ग्राहकाच्या मदतीने शहानिशा करण्याचे ठरविले होते. ठरल्याप्रमाणे तिथे बोगस ग्राहकाला पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा बोगस ग्राहक तिथे गेल्यानंतर त्याने काही दलालाच्या मदतीने शारीरिक संबंधासाठी तरुणीसह महिलांची मागणी केली होती. त्यानंतर त्याला मिराकी हॉटेलमध्ये सुरु असलेल्या एका रुममध्ये नेण्यात आले होते.
तिथे त्याला काही तरुणीसह महिलांना दाखविण्यात आले होते. प्राथमिक तपासात तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर बोगस ग्राहकाकडून पोलिसांना सिग्नल प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बचुटे, प्रकाश शिरसाठ, प्रलास वाघ, पोलीस शिपाई संतोष कांबळे, गणेश खेडकर, सचिन चव्हाण, महिला पोलीस शिपाई साक्षी साठे आदी पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी पाच वेश्यादलाल तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची नावे शंकर यादव, रघु शर्मा, बाबूलाल सिंग, मनोज यादव आणि रमेश यादव असल्याचे उघडकीस आले. घटनास्थळी पोलिसांना सहा महिला सापडल्या.
त्यांच्या चौकशीत तिथे सेक्स रॅकेट चालत असल्याचे उघडकीस आले. पाच आरोपी संबंधित तरुणीसह महिलांच्या इतर पुरुषासोबत शारीरिक संबंधासाठी प्रवृत्त करत होते. ग्राहकाकडून मिळणारी काही रक्कम त्यांना दिल्यानंतर उर्वरित रक्कम स्वतसाठी ठेवत होते. तपासात उघडकीस आलेल्या या माहितीनंतर पाचही आरोपींना वांद्रे पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी नेण्यात आले होते. पोलीस शिपाई गणेश खेडकर यांच्य तक्रारीवरुन त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
अटकेनंतर त्यांना गुरुवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत जागेचा मालक जयराम फर्नाडिस याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून तिथे सेक्स रॅकेट चालत होते. ताब्यात घेतलेल्या तरुणीसह महिला इतर राज्यातील रहिवाशी असून वेगवेगळे आमिष दाखवून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. सुटका केलेल्या सहाजणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.