मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – अश्लील चाळे करुन एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार विलेपार्ले परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच उत्तम नावाच्या ४८ वर्षांच्या आरोपीस जुहू पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
१४ वर्षांची ही मुलगी विलेपार्ले येथे तिच्या पालकांसोबत राहत असून सध्या ती एका खाजगी शाळेत शिक्षण घेते. रविवारी रात्री साडेअकरा वाजता ती घराजवळ उभी होती. यावेळी तिथे आरोपी उत्तम आला आणि त्याने काहीही कारण नसताना तिला अश्लील शिवीगाळ केली. काही वेळानंतर त्याने स्वतची पॅण्ट काढून तिच्यासमोरच अश्लील चाळे केले होते. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली आणि घरी जाण्यासाठी निघाली. यावेळी त्याने तिला हा प्रकार कोणाला सांगितला तर बघून घेण्याची धमकी दिली होती. घडलेला प्रकार घरी आल्यानंतर त्यांनी जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी उत्तमविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ३५४ अ, ५०६, ५०९ भादवी सहकलम १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हादाखल होताच त्याला पोलिसांनी विलेपार्ले येथून अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.