मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – लग्नाच्या आमिषाने एका २३ वर्षांच्या तरुणीने तिच्याच प्रियकराने वारंवार जबदस्तीने लैगिंक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकर भौमिक लंकेश पाठक याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत तरुणी ही कुर्ला येथे राहत असून ती सोशल मिडीयावर सक्रिय असते. एका डेटिंग ऍपवरुन तिची भौमिक पाठकशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटत होते. याच दरम्यान भौमिकने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तिनेही त्यास होकार दिला होता. फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत त्याने तिला अनेकदा अंधेरीतील वर्सोवा, जानकीदेवी स्कूल रोडवरील एका हॉटेलमध्ये आणले होते. तिथे लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार करत होता. काही दिवसांपासून त्याच्या वागण्यात प्रचंड बदल झाला होता. त्यांच्यात सतत खटके उडू लागले. शारीरिक संबंधासाठी तो तिच्यावर जबदस्ती करत होता. तिला मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त करत होता. केवळ शारीरिक संबंधासाठी भौमिकने वापर करुन तिची फसवणुक केली होती. या घटनेनंतर तिने त्याच्याविरुद्ध नेहरुनगर पोलिसात केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर पोलिसांनी भौमिकविरुद्ध ११५ (२), ३५१ (२), ३५२ ६४ (१) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा अंधेरीतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये झाला होता, त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास नंतर वर्सोवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. गुन्हा दाखल होताच रविवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील सुट्टीकालिन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. भौमिक हा मिरारोडचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.