मुंबई-अदिसअबाबा विमानात ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न
आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या प्रवाशासह पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – मुंबई-आबूधाबी विमानात अत्यंत ज्वनलशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला, मात्र विमानात बसण्यापूर्वीच त्याच्या बॅगेतून अचानक धूर आला आणि काही वेळात बॅगेने पेट घेतला. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका प्रवाशासह त्याच्या चार सहकार्यांना सहार पोलिसांनी अटक केली आहे. समीर नारायण बिश्वास, बिश्भूभाई ऊर्फ विश्वनाथ बाला सुब्रमणी सेंतुतर, नंदन दिनेश यादव, अखिलेश गजरात यादव आणि सुरेश सुब्बा सिंग अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या पाचही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. समीर हा ज्वलनशील पदार्थ घेऊन आंतरराष्ट्रीय आला होता. या ज्वनलशंील पदार्थामुळे विमानात आग लागू शकते, विमानातील इतर प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकते याची माहिती असताना समीरने ते ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यांत नवीन शर्मा याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तो सध्या विदेशात आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी लवकरच लुक आऊट नोटीस बजाविण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता समीर बिश्वास हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याला इथोपियन एअरवेजने आबूधाबी येथे जायचे होते. यावेळी त्याने त्याच्या बॅगेतून ज्वनलशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्याच्या बॅगेने पेट घेतला होता. मात्र तिथे उपस्थित अग्निशमन दलाने काही वेळात ही आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर समीरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने बॅगेतून हायड्रोयजन स्पिरीट वाहतूक करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली होती. त्यानंतर विश्वनाथ सेंतुतर, नंदन यादव, अखिलेख यादव आणि सुरेश सिंग या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या पाचजणांना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात समीर हा मूळचा कोलकाताच्या नदीया, ताहीतूरचा रहिवाशी असून त्याने पाहिजे आरोपी नवीन शर्मा याच्या सांगण्यावरुन ते ज्वनलशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न केला होता. याकामी त्याला इतर चौघांनी मदत केली होती. नंदने त्याला ज्वनलशील पदार्थ विमानतळाबाहेर दिले होते. सुरेशचा सहार कार्गोजवळ ए. एस लॉजीस्टिकचा व्यसाय असून त्यानेख विश्वनाथ, नवीनच्या मदतीने समीरला ते ज्वलनशील पदार्थ देण्यसाठी नंदनला दिले होते. विश्वनाथने नवीनच्यासांगण्यावरुन सुरेश सिंगला भारताबाहेर पाठविण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. अखिलेशने ते ज्वलनशील पदार्थ विमानतळापर्यंत आणण्यासाठी वाहतूकीची व्यवस्था केली होती. या कामासाठी त्यांना नवीन शर्माकडून काही रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. पाचही आरोपी पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
विमान प्रवासादरम्यान हायड्रोजन स्पिरीटमुळे विमानाला आग लागण्याची शक्यता होती, त्याने विमानातील प्रवाशांच्या जिवाला होता, तरीही या ज्वलनशील पदार्थ विदेशात नेण्याचा प्रयत्न आरोपींकडून झाला होता. या घटनेमागे त्यांचा काय उद्देश होता, यापूर्वीही अशा प्रकारे ज्वनशील पदार्थ विदेशात नेणयाचा प्रयत्न झाला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. समीरकडून जप्त केलेला डायड्रोजन स्पिरीटफॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त दौलत साळवे, वरिष्ठ पोलीस निररीक्षक धनंजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली बापूराव गावडे, मंगेश बोरसे, अश्विनी ननवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कदम, संदीप शिंदे, विक्रम पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ बनसोडे, भूषण जाधव, सुनिल वग्रे, प्रकाश सादळे, पोलीस शिपाई सागर गायकवाड यांनी केली.