पत्नीला दारु पाजून अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार
मालाडच्या मालवणीतील घटना; पित्याविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ ऑगस्ट २०२४
मुंबई, – पत्नीला दारु पाजून स्वतच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच पित्याने लैगिंक अत्याचार केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारी घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. यापकरणी पिडीत मुलीच्या मावशीच्या तक्रावरुन मालवणी पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पिता पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
तक्रारदार महिला ही बोरिवली परिसरात राहत असून तिची बहिण तिच्या पती आणि तेरा वर्षांच्या मुलीसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहते. २७ जुलैला आरोपीने त्याच्या पत्नीला मद्यप्राशन करण्यास प्रवृत्त केले. दारु पाजल्यानंतर त्याने तिला झोपण्यास सांगितले. काही वेळानंतर त्याने घराच पायावरुन स्वतच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिला नकोसा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर त्याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्याशी त्याने लैगिंक अत्याचार केला होता. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. दोन दिवसांपूर्वी तिची तक्रारदार मावशी तिथे आली असता तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. त्यानंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पिडीत मुलीच्या वडिलांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी ७६, ६४ (१), ६५ (१), ३५१ (३) भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ६, ८ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी पिता पळून गेला आहे. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.