तीन ते सतरा वयोगटातील आठ अल्पवयीन मुलींचा विनयभंग

सात आरोपींना अटक तर एका आरोपीचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – तीन ते सतरा वयोगटातील आठ अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची नोंद करण्यात आली. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली तर एका तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला योग्य ती समज देऊन त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे. एका गुन्ह्यांतील पळून गेलेल्या आरोपीचा मालाड पोलिसांकडून शोध सुरु आहे. या आठही घटना सांताक्रुज, पवई, वडाळा, दहिसर, गोरेगाव, अंधेरी, साकिनाका, चेंबूर आणि मालाड परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर सहाही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले आहे.

३४ वर्षांची तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहते. पिडीत तिची तेरा वर्षांची एक मुलगी असून दुसरी मुलगी तिची मैत्रिण आहे. १८ ऑगस्ट आणि २० ऑगस्टला या दोघींचा याच परिसरात राहणार्‍या अर्जुन या तरुणाने अश्‍लील संभाषण करुन त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मैत्रिणीच्या केसांवरुन हात फिरवून तिच्याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो त्यांच्याकडून नेहमीच अश्‍लील नजरेने पाहत होता. हा प्रकार या मुलीने तिच्या आईला सांगताच तिने अर्जुनविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. दुसर्‍या घटनेत एका तेरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच परिचित तेरा वर्षांच्या मुलाने अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तेरा वर्षांच्या मुलाविरुद्ध आरएके मार्ग पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला योग्य ती समज देऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते. पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा एकाच सोसायटीमध्ये राहतात. १८ ऑगस्टला सोसायटीमध्ये खेळत असताना त्याने तिला टेरेसवर आणले आणि तिथेच तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. हा प्रकार नंतर मुलीने तिच्या पालकांना सांगितला. गुरुवारी तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार केली होती.

साकिनाका येथील एका तिसर्‍या घटनेत एका पंधरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाला. ही मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत जात असताना सोमन नावाच्या एका तरुणाने तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिला जोरात धक्का दिला होता. तिला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी साकिनाका पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करुन काही तासांत आरोपीस अटक केली. चेंबूर येथील तिसर्‍या घटनेत संजय नावाच्या एका ५० वर्षांच्या व्यक्तीने दहा आणि अकरा वर्षांच्या दोन मुलींच्या छातीला अश्‍लील स्पर्श करुन विनयभंग केला होता. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडल्यानंतर या दोन्ही मुलींनी त्यांच्या पालकांना ही माहिती सांगितली होती. पालकांकडून ही माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी काही तासांत आरोपीस अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मालाड येथील एका घटनेत तेरा वर्षांच्या मुलीला अश्‍लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला. ही मुलगी तिच्या आईसोबत ऑलेम चर्च स्टॉप ते आदर्श सिग्नलदरम्यान बसमध्ये प्रवास करताना ही घटना घडली होती. याप्रकरणी या मुलीच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी मोईनोद्दीम शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

अंधेरी येथे एका सतरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आमीर नावाच्या ३२ वर्षांच्या रिक्षाचालकास आंबोली पोलिसांनी अटक केली. ही मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत घरात झोपली असताना तिच्या शेजारी राहणारा आमीर तिच्या घरी आला आणि त्याने झोपेत असलेल्या मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. पवईतील घटनेत एका दहा वर्षांच्या मुलीच्या गळ्यात हात टाकून तिच्या गाल ओढून एका ३४ वर्षांच्या व्यक्तीने तिच्याशी अश्‍लील वर्तन केले केले. हा प्रकार समजताच तिच्या नातेवाईकांनी मोलाय नावाच्या आरोपीविरुद्ध पवई पोलिसात तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

गोरेगाव येथे एका पंधरा वर्षांच्या मुलीच्या ओठांचा तीन ते चार वेळा किस करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रणयकुमार नावाच्या एका २० वर्षांच्या तरुणाला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. ही मुलगी गोरेगाव येथे राहत असून क्लासवरुन घरी जात असताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अशी दुसरी घटना दहिसर येथे घडली. एका चौदा वर्षांच्या मुलीला किस करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच अर्जुन नावाच्या एका ३० वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. अर्जुन हा मिरारोड येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page