मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ सप्टेंबर २०२४
मुंबई, – भरस्त्यात अश्लील वर्तन करुन एका ३० वर्षांच्या महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच संतोष नारायण अहिरे या ४८ वर्षांच्या आरोपीस सांताक्रुज पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
३० वर्षांची तक्रारदार महिला विलेपार्ले येथे राहत असून खाजगी नोकरी करते. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता विलेपार्ले येथील रेल्वे स्थानक ते लाला लजपतराय रोडच्या दिशेने जात होती. यावेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने स्वतच्या पॅट खोलून तिला पाहून अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर तिने सांताक्रुज पोलिसांना कॉल करुन ही माहिती सांगितली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी आरोपीस संतोष अहिरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या महिलेच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी संतोषविरुद्ध ७८, ७९ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संतोष हा विलेपार्ले येथे राहत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.