मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सुमारे पंधरा लाखांचा हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन एका साऊंड इंजिनिअरची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. रेणू इंद्रजीत रतन, प्रदीप जनार्दन लोटेकर, अजय जनार्दन शहा आणि मुकूंद विनोद पटनी अशी या चौघांची नावे असून ते चौघेही कांदिवलीतील चारकोपचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रणजीत मनोहर कांबळे हे साऊंट इंजिनिअर असून ते गेल्या चार वर्षांपासून चारकोपच्या सेक्टर आठच्या शेल अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक सी/४०४ मध्ये राहतात. हा फ्लॅट त्यांनी संबंधित चारही आरोपीकडून पंधरा लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर घेतला होता. याबाबत त्यांच्यात करार झालेला आहे. फ्लॅटचा ताबा मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना पन्नास हजार रुपये ब्रोकरेज दिले होते. काही दिवसांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटवर बँकेचे कर्ज असल्याचे तसेच कर्जाचे नियमित हप्ते भरले जात नसल्याचे बँकेने फ्लॅटवर कारवाईची नोटीस बजाविली होती. हा प्रकार समजताच त्यांनी फ्लॅट खाली करुन चारही आरोपींकडून त्यांच्या हेव्ही डिपॉझिटच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र या आरोपींनी त्यांना हेव्ही डिपॉझिटसह ब्रोकरेची १५ लाख ५० हजार रुपये देण्यास नकार दिला. त्यांच्या हेव्ही डिपॉझिटचा अपहार करुन फसवणुक केली होती.
या प्रकारानंतर त्यांनी चारकोप पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रेणू रतन, प्रदीप लोटेकर, अजय शहा आणि मुकूंद पटनी यांच्याविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.