अल्पवयीन मुलीवरील लैगिंक अत्याचारप्रकरणी आरोपीस अटक
मेडीकलदरम्यान गरोदर असल्याचे वैद्यकीय चाचणीतून उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – डोक्याला दुखापत झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलेल्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची मेडीकलदरम्यान ती गरोदर असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर तिच्यावर तिच्याच परिचित तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ऍण्टॉप हिल पोलिसांनी १९ वर्षांच्या आरोपीस अटक केली असून त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
३३ वर्षांची ही महिला ऍण्टॉप हिल परिसरात राहते. पिडीत तिची पंधरा वर्षांची मुलगी आहे. तिच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यामुळे तिची आई तिला घेऊन सायन हॉस्पिटलमध्ये आली होती. यावेळी तिची मेडीकल करण्यात आली होती. त्याचा अहवाल प्राप्त होताच डॉक्टरांना ती दिड महिन्यांची गरोदर असल्याचे समजले होते. त्यामुळे डॉक्टरांनी ही माहिती ऍण्टॉप हिल पोलिसांना दिली. मुलगी अल्पवयीन असून ती दिड महिन्यांची गरोदर असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासात ही मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या परिचित आहेत.तिच्या आत्या बहिणीचा आरोपी मित्र असून त्याने तिला प्रपोज केले होते. त्यांनतर त्यांच्यात प्रेमसंबंध आले होते. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला नव्हता. डोक्याला दुखापत झाल्यांनतर तिला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मेडीकलमुळे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला काही तासांत ऍण्टॉप हिल येथून पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची लवकरच मेडीकल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.