मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – नागपाड्यातील अन्य एका कुंटनखान्यात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करताना नागपाडा पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली. या महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. बळीत महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत जयराम ननजुडे गौड या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध भान्याससह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत सत्या गौडा, तुलसी दास, भरत गौडायानी या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नागपाड्यातील कामाठीपुरा, चौदावी गल्ली, पेपरवाला इमारतीमध्ये काही महिलांना डांबून ठेवून तिथे त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने पेपरवाला इमारतीच्या फ्लॅट क्रमांक सत्तरमध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे पोलिसांना सहा महिला सापडल्या. चौकशीदरम्यान या महिलांना विविध कारण सांगून तिथे आणण्यात आले होते. त्यांना तिथे डांबून ठेवून त्यांच्या मदतीने सेक्स रॅकेट चालविला जात होता. हा प्रकार उघडकीस येताच जयराम गौड याला पोलिसांनी अटक केली. सुटका केलेल्या सर्व महिलांना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. जयरामसह इतर तीन पाहिजे आरोपींनी तिथे काही महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले असून पळून गेलेल्या तिन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.